Join Whatsapp

भाजप कार्यकर्ते संभ्रमात 50 गाड्याचा ताफा नांदेड साठी रवाना

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – २७ ऑक्ट.२४ – मागील चार दिवसापासून रवी राठी यांनी भाजपामध्ये प्रवेश घेऊन राजकीय क्षेत्रात एक नवीन यु टर्न आल्याचा दिसत आहे.

सध्याच्या परिस्थितीत तिसरी यादी कधी जाहीर होते व हरीश पिंपळे यांचा नाव त्यामध्ये कधी येते याची वाट हरीश पिंपळे समर्थक बघत आहे.

कालच्या आलेल्या रवि राठी ला पक्ष उमेदवारी देईल का असा प्रश्न आमदार हरीश पिंपळे यांच्या समर्थकांना पडला आहे.

हरीश पिंपळे वेळोवेळी समर्थकांची समजूत घालवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ते विफल ठरत आहे समर्थक संभ्रमात असून काय करावं काय नाही करावं असे त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित होत आहे कोणाचीच न ऐकता ते सैरावैरा पळत आहे.

रवी राठी यांना खरंच उमेदवारी मिळाली आहे का?

जेव्हा पर्यंत यादीमध्ये हरीश पिंपळे यांचा नाव येत नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसू नाही असे समर्थकांचे म्हणणे आहे.

आज सकाळी बूथ प्रमुखांचा एक ताफा नागपूर येथे गेला असून दुसरीकडे चाळीस ते पन्नास गाड्यांचा ताफा नांदेडकडे रवाना झाला आहे,

नांदेड येथे आज भाजप प्रदेश अध्यक्ष यांचा निवडणुकीचा काही कार्यक्रम असून कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी मूर्तिजापूर येथून नांदेड कडे रवाना झाले आहे. त्यामध्ये तालुकाध्यक्ष वेगवेगळे सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहे.

पण नांदेड येथे पोहोचण्याच्या अगोदर जर इकडे तिसरी यादी जाहीर झाली तर काय?

उद्या चालून पाकिस्तान वरून कुठला नेता जर भाजपमध्ये प्रवेश घेत असेल तर त्याला भाजप सरळ आमदार बनवणार का? राहुल गुल्हाने (भाजप शहर अध्यक्ष)


Share

Leave a Comment

error: Content is protected !!