Join Whatsapp

अंगी एकतरी असू दे कला!’ही निर्मीती भावना देणारी सृजन साहित्य संघाची मासिक काव्यमैफल अतिशय आनंद व उत्साहात संपन्न !

Photo of author

By Sir

Share

मूर्तिजापूर – येथील सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व्दारा आयोजीत वर्धापन दिन मासिक काव्यमैफल लोट्स इंटरनॅशनल स्कूल, हरियानगर,मूर्तिजापूर येथे भरगच्च अशा साहित्यीक कार्यक्रमांच्या सोबतीने उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम या कार्यक्रमात ग्रामगीता ग्रंथाचे व देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी बँक व्यवस्थापक अरुण कातखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या वैशाली खडतडकर लाभल्या होत्या.अध्यक्ष व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर उपस्थित कवींचे गुलाब पुष्प पेन डायरी देऊन स्वागत करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र जवादे संदीप वाकोडे मिलिंद इंगळे विष्णु लोडम विलास वानखडे (वर्धापनदिन असल्यामुळे)यांनी केले.

गझलाकार संदीप वाकोडे यांनी गझल,कविता व साहित्य निर्मीती या विषयी संवाद साधला.

विदयार्थीदशेतच ‘जिंदा दिमाग मरा दिमाग’पुस्तकाचे लेखन करणारा स्वराज मोरे,मूर्तिजापूर याचा अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याने रसिकांशी मनमोकळा संवाद साधून पुस्तक निर्मीतीची भूमिका विषद केली.

यानंतर सुनिल ढोकणे प्रवीण नागपूरे मिलिंद इंगळे आमीर हुसेन निलेश उंबरकर रवींद्र जवादे शरदचंद्र मेहकरे विलास निलखन विलास वानखडे यांनी कराओके गीत सादर करुन आनंदी वातावरण तयार केले.माया दवंडे उज्ज्वला सवईकर यांनी भजन गाऊन मैफलीला आध्यात्म स्वर दिला.तृप्ती उंबरकर यांनी कवींचे नाव गुंफून सादर केलेल्या भारुडाला प्रेशकांनी उत्स्फुर्त टाळया दिल्या.

मीना जवादे यांनी महिन्याचे विशेष कवी अंतर्गत’उठो द्रौपदी वस्त्र संभालो ‘ही हिंदी रचना सादर केली.

यानंतर संदीप वाकोडे,ज्ञानदेव भड,कमलकिशोर जयस्वाल,प्रदीप येसनकर,प्रमोद पंत,सुनिल डोंगरदिवे,विनोद महल्ले,किशोर आष्टीकर,विजय इंगळे,रामकृष्ण आसरे,विष्णु लोडम,प्रमोद पंत,शैलेश गिरी,रेणू नागोरे,विदयाताई गोसावी, निलिमा आष्टीकर,योगिता चिंचे,यांनी आपल्या सुंदर काव्यरचना सादर केल्या .

उपस्थित कवी व रसिकांनी सदर मैफलीचा भरभरून आनंद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतीथी यांनी कलेचे महत्व विषद करून गीत व कविता सादर केली.या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन निलिमा आष्टीकर यांनी तर आभारप्रदर्शन विलास निलखन यांनी केले.’हीच आमची प्रार्थना ‘ने मैफलीचा शेवट झाला.

प्रशांत पंत सोनाली पंत पुजा शिले सिमा मोरे कृष्णा राठोड वैशाली मोरे सरीता हाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती लाभली होती. सदर मैफलीच्या सहआयोजनामध्ये गझलदीप प्रतिष्ठान,कलाविष्कार बहु.संस्था,नेहरू युवा मंडळ, ज्ञानन र्मदा बहु. संस्था मूर्तिजापूर यांचे सहकार्य लाभले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!