Join Whatsapp

रोटरी क्लबच्या वतीने जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे चेजींग रूम व सॅनिटरी पॅड मशिनचे उद्घाटन

Photo of author

By Sir

Share

अकोला – दिनांक 11/10/2024 रोजी जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा या ठिकाणी शालेय व्यवस्थापन व विकास आराखडा समिती अंतर्गत भौतिक सुविधा आढावा सभा आणि चेजींग रूम व सॅनिटरी पॅड मशिन उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी क्लब अकोला नॉर्थ यांचे सौजन्याने ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भांबेरी या संस्थेचे अध्यक्ष आ.विजयराव कौसल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यींनीना आरोग्य संपन्न सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतुन विद्यार्थीनींकरीता संस्थेचे वतीने चेजींग रूम व सॅनिटरी पॅड मशिन उपलब्ध करून देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून नया अंदुरा येथील सरपंच सौ.इंगळेताई, उपसरपंच सौ.सुनिताताई सैवाल, कारंजा (रम) येथील सरपंच सौ.प्रमीलाताई कोगदे, उपसरपंच सौ.ज्योतीताई खोंड , नया अंदुरा येथील अंगणवाडी सेविका सौ.शारदा रोहणकार,सौ.रेखाताई माळी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. कुचके मॅडम यांनी तर प्रास्ताविक आणि अध्यक्षीय भाषण प्राचार्य आर.बी.भगत यांनी केले.कु.गिर्‍हे यांनी सॅनिटरी पॅड मशिन कशी वापरावी या विषयी मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन प्रा .कु.वानखडे मॅडम यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी कु.गावंडे मॅडम,प्रा.कु.तायडे मॅडम, कु.पाटकर मॅडम,कु.गिर्‍हे मॅडम यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाकरीता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!