Join Whatsapp

सावधान ! मतदाराला निव्वळ मूर्ख बनविण्याचे कार्यक्रम -विधानसभा ३२

Photo of author

By Sir

Share

सावधान – मागील एक वर्षापासून मुर्तीजापुर शहर येथे काही पॅराशूट उमेदवार आपला ठिया मारून बसले आहे.

पहिले एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण करतात नंतर बघता बघता कदी हे समाजसेवक पासून राजकारणी बनतात हे लोकांना समजलेच नाही.

आपल्या संस्थेचा कार्यालय भाड्याने घेऊन तेथे पहिले काही स्थानिक शिक्षित लोंकाना सामाजिक संस्थे मध्ये रोजगार दिला जातो नंतर सोशल मिडियाचा जाळे तयार करून आपल्या संस्थेचे कार्य सोशल मिडियाचा वर टाकून लोकांन पर्यंत संस्थे बद्दल माहिती पोहोचविली जाते.

नंतर संस्था सरकारी योजनेतून आपल्या साठी काय काय मदत करू शकते बेरोजगारांसाठी योजना,कायदे विषयक सल्ला, असे आमिष दाखवून लोंकाना कार्यलयापर्यंत बोलविले जाते

भोळी भाबडी जनता आपले प्रश्न व समस्या घेऊन त्या कार्यालयात जाऊ लागते त्या मध्ये बेरोजगार युवा युवतीचे प्रश्न असो की कायदे विषयक सल्ला किंवा उद्योग विषयक काही योजना त्या संस्थेने खूप हुशारीने लोकांना आपल्या पर्यंत बोलवण्याचे नियोजन केले जाते.

सगळ्या मतदासंघातील जनतेला विविध समस्यांवर संस्थेच्या मार्फत जनतेला आकर्षित केले जाते. प्रत्येक कामासाठी संस्थेच्या माध्यमातून लोकांचे मोबाइल नंबर, ईमेल आयडी, व शिक्षण इत्यादी घोष्टी ची माहिती मिळवली जातात.

नंतर काही संस्थेत कार्यरत असणाऱ्या नोकरदारवर्गाकडून स्थानिक असल्याचा फायदा घेत लोकांवर त्यांच्याकडून विश्वास संपादित केला जातो.

त्यानंतर जेव्हा काही जयंती व इतर कुठले सण असेल तर गोळा केलेल्या डाटाच्या आधारे त्यांना फोन करून संस्था कार्यालयावर बोलाविले जाते व लोकांच्या समस्या व मुद्दे बाजूला ठेवून महापुरुषांची जयंती पुण्यतिथी व इतर कार्यक्रम साजरे केले जातात.

नंतर संस्थेचे जे एक पदाधिकारी आहे त्या त्यामधून एक पदाधिकारी खूप सक्षम असून त्याना राजकरानाचा खुप अभ्यास आहे त्याची गल्ली ते दिल्ली पर्यंत खूप ओळख आहे लोकांना तमसो मा ज्योतिर्गमय समजविन्यात येते.

आपले भविष्य अंधारातून प्रकाशाकडे कशे जाऊ शकते असे या अंधार वाटेत समजसेवक आपल्याला उज्वल भविष्यासाठी काय मदत करू शकतात हा विश्वास आपल्या भाषणातून सांगन्यात येते, भाषण करता करता आम्ही कोण आमची राजकारणात पार्श्वभूमी काय हे सांगण्यात येते.

तसेच कोणत्या महामानवाच्या विचाराच वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत, भविष्यात कसे तुमचे काम आम्ही करू असे अनेक मुद्दे या भाषणाच्या माध्यमातुन सांगितले जातात व हळु हळू संस्थे तर्फे होणाऱ्या समाजकारनातुन राजकारण करण्याची सुरुवात होते.

नंतर समस्या असलेले लोक हळू हळू यांचा सोबत जुळत जातात व यांना आपली समस्यांचे सांगतत तुमच्या समस्यांन समाधान आमचाच कडे आहे असे या आशावादी लोकांना खोटे आश्वासन दिले जातात, समस्येने ग्रसित लोक यां माणसाला हळू हळू आपला कैवारी म्हणून या नेत्यावर आपले विश्वास टाकतात व संस्थेचा पदाधिकाऱ्यां वरती पण लोकांची आशा वाढायला सुरुवात होते व तुम्ही आम्हाला जर आमदार निवडून दिले तर आम्ही तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू अशी आपली त्या लोकांन समोर इच्छा व्यक्त करतात प्रसार माध्यमाना पैसे व जाहिराती देऊन स्वतचे राजकीय हेतू जनते समोर ठेवले जातात.

तसेच मतदारसंघात आपली ओळख अजून वाढावी व प्रत्येक घटकांनी आपल्याला ओळखावे या साठी विविध कार्यक्रमाचे सपाटे लावले जातात.

महिला हे खूप भोळ्या असतात व त्यांना फुकटचे गिफ्ट चांगले वाटते अभ्यासु असल्यामुळे यांना महिलांची मानसिकता खूप चांगल्या प्धतीने माहीत आहे मग फुकट काही पैठणी,कुकर वाटण्याचे कार्यक्रम सुरू होते, असे अनेक अमिष दाखवणारे कार्यक्रम महिलांसाठी संस्थेमार्फत ठेवले जातात.

या हुशार व अभ्यासु वर्गाने महिला वर्गाला पहिले आकर्षित करतात नंतर महिलांना कार्यक्रमाचे VVIP पास वाटून त्यावर आपले त्या वर फोटो लावतात व कार्यक्रमात आल्यावर VVIP पास धारकांना सामान्य जागी बसवितत व सुनियोजित पद्धतीने कार्यक्रम घेऊन गावातील प्रतिष्ठित महिलांना पहिले,दुसरे,तिसरे, क्रमांक दिले जाते. तसेच बाकीच्या महिलांना मूर्ख बनविण्याचे काम केले जाते.

कार्यक्रम घेऊन घेऊन जेव्हा पैशांचे बजेट कमी जास्त होते तेव्हा प्रसिद्धी ही चालतच राहावी या मध्ये कोणतीही तळ जोड नको या उद्देशातून वर्षातून दोन वेळेस आपले वाढदिवस साजरा करतात.

अशा उमेदवारांना मूर्तिजापूर जनतेचा सलाम.

असे अनेक किस्से भावी उमेदवाराचे आहे पुढच्या भागात युवा उद्योजकांना कसे वर्षभरापासून संस्थे तर्फे मूर्ख बनविण्याचे काम सुरू आहे हे पाहूया…..

विषय एवढाच सोसेल तेवढ बोलावं !


Share

Leave a Comment

error: Content is protected !!