Join WhatsApp group

एसटी तिकिटाच्या दरात 10 टक्के भाडेवाढ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई – 11 ऑक्ट.24 – ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला हा अधिकार दिला आहे.

ज्यामुळे २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या एक महिन्यात ही भाडेवाढ लागू होईल. या वाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे १९५० ते १००० कोटी रुपये महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.दिवाळीच्या सुट्टीत अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटन स्थळांना भेटी देण्याची योजना आखतात. दिवाळी आणि अन्य सुट्टीच्या काळातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभरात महामंडळाने गर्दीच्या हंगामात उत्पन्न वाढविण्यासाठी जादा गाड्या चालवण्याची योजना आखली आहे.या भाडेवाढीत साधा, विठाई, शिवशाही, आणि निमआराम यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी गाड्यांसाठी भाडेवाढ लागू होणार नाही.

या १० टक्के भाडेवाढीमुळे राज्यातील प्रवाशांचा दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणे महागणार आहे.सध्या, महामंडळाला दिवसाला २३ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न मिळत आहे, जे हंगामी भाडेवाढीमुळे ३० कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला ९५० ते १००० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, जे सध्या ८५० कोटी रुपये आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!