Join Whatsapp

मुर्तिजापूर मध्ये भा.ज.प. चा ढोंगीपणा.

Photo of author

By Sir

Share

आज दि. १० ऑक्टोबर २४ रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर काटेपूर्णा बेरेज प्रकल्प, तालुका मुर्तीजापुर जिल्हा अकोला म. राज्यपाल सिंचन अनुशेष कार्यक्रमा अंतर्गत अर्थ सहाय प्राप्त काटेपूर्णा बेरेज प्रकल्पाचे मातीधारण, बरेज पुर्वारचीत पुर्वाबालीत पूल व संलग्न कामे तसेच बेरेच्या उभे उचल पद्धतीच्या द्वारा निर्मित व उभारणीचे कामांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा सहकार्याने व मुर्तीजापुरचे तडफदार विकास पुरुष आमदार श्री हरीश मारोतीअप्पा पिंपळे यांचा विशेष प्रयन्त्नाने मंजूर ५३३.८१ कोटी रुपये निधीतून निर्माण झालेल्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा काटेपूर्णा बेरेज प्रकल्प ता. मुर्तीजापुर जिहा अकोला येथे मा. राधाकृष्ण विखे पाटील मा. अनुप धोत्रे व काही कार्यकर्त्याचे नाव लावून शहरात व जिल्ह्यात निमंत्रण पाठवून प्रसार मध्यमावरून वाजागाजा करण्यात आला व लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. त्या मध्ये प्रकल्पाचे फायदे पण सांगण्यात आले.

ज्यांनी हे जलसिंचनाचे तिन्ही प्रकल्प आणले आणि निधी आणला माजी आमदार तुकारामजी बिडकर यांना त्या कार्यक्रमाला बोलविले नाही व त्यांच्या नावाचा उल्लेख पत्रिकेवर किवा कार्यक्रमा मध्ये सुद्धा भाजप ने केले नाही . निवडणूक जवळ आली तर प्रसिद्धी पोटी संपूर्ण श्रेय हे आमदार साहेबांनी लाटल्याचे दिसत आहे.

सध्या तुकारामजी बिडकर हे अजित पवार गटात असून ट्रिपल इंजन सरकार मध्ये त्यांचे जिह्यास्तरावर खुप मोठे स्थान आहे.

जेव्हा मुर्तीजापुर मतदार संघ भकास होता तेव्हा तुकारामजी बिडकर यांनी विकास काय असतो ते या मतदार संघाला दाखविले आहे.

क्रीडा असो व शिक्षण, आरोग्य असो कि रस्ते, अशे अनेक कामे त्यांनी या मतदार संघात केली आहे, जो विकासाचा पाया त्यांनी रचला होता.

त्या वर आजचे विकास पुरुष विकास करत आहे. हे मात्र भाजप आपल्या १५ वर्षाचा कार्यकाल मध्ये या बाबी विसरली आहे का?

सत्ते मध्ये असताना आंधळी झाली ?

दुसऱ्या घटक पक्षची त्यांना गरज राहली नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे.

हा प्रकरण सध्या मुर्तीजापुर शहरात चांगलाच रंगला असून अजित पवार गटाचे कार्यकर्ते व नेत्यांची खूप नाराजी पाहायला मिळत आहे. शहरात सध्या या उद्घाटनाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत या प्रकरणाचे परिणाम भाजपला भोगावे लागेल का ?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!