Join Whatsapp

विधानसभेसाठी रणनीती की राजनीती?

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – निवडणूकित साम,दाम,दंड,भेद चा वापर होताना आपण अनेक वेळेस बघितलं असेलच.

पण मतदार संघ 32 मध्ये सध्या दाम आणि भेद याचा वापर जास्तीच होतोय का ?

मुर्तिजापूर बार्शीटाकळी विधानसभा 32 मध्ये येणाऱ्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा कडून कोट्यवधी रुपयांचे उद्घाटनाचे कार्यक्रम बघायला मिळत आहे.

पण मात्र मतदार राजाला अमिष दाखवण्यासाठी कोणतेही राजकीय, सामाजिक, महिला मंडळ, अध्यात्मिक, धार्मिक, असे कोणतेच कार्यक्रम घेण्यात आले नसून शांत राहून आपला काम छुप्या पद्धतीने भा.ज.प. करत आहे का?

सध्या मतदार संघ ३२ मध्ये दाम आणि भेद या सूत्राचा आधार घेऊन भाजप पक्ष आपली रणनीती तयार करत आहे का?

मतदार संघ ३२ मध्ये अनुसूचित जातीचे मतदार जास्त असून सुद्धा येथे हिंदू अनुसूचित जातीचे विद्यमान आमदार गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घट्ट धरून फडकवत आहे.

गेल्या 15 वर्षाचा इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसने पॅराशुट उमेदवार उभे करून आपली निवडणूक या मतदार संघात लढवली. यामध्ये रवी राठी हे अपवाद आहे.

या वर्षी थोडी परिस्थिती वेगळी झाली असून जिल्हा परिषद चे माजी सभापती असलेले सम्राट डोंगरदिवे हे रा.का.प. शरदचंद्र पवार यांची तुतारी घेऊन संपूर्ण मतदारसंघात फिरत आहे. विद्यमान आमदारांना ते निवडणुकीत टक्कर देण्यासाठी सक्षम आहे.

त्यांची कामे सध्या प्रसारमाध्यमांवर खूप गाजत आहे. पण रा.क.प. शरदचंद्र पवार पक्ष सम्राट डोंगरदिवेना तिकीट देणार का?

किंवा तुतारी वाजवायला वेळेवर पक्ष आपला कोणी दुसरा उमेदवार देईल का?

मतदार संघ 32 मधून तुतारी वाजवण्यासाठी 15 इच्छुक उमेदवारांची तयारी आहे. रोज शहरात नवनवीन उमेदवाराचे कार्यक्रम, सोशल मीडिया पोस्ट,जाहिरातीचे फलक, त्यांचा स्वतःचा नावाचा बोंभाटा करताना दिसत आहे.

पण काही अनुसुचित जातीचे उमेदवार मतदार संघात येऊन घरोघरी जाऊन आपला प्रचार छुप्या पद्धतीने करताना दिसत आहे व विविध कार्यक्रम घेण्याचा तयारीत सुद्धा आहे.

छुपे उमेदवार मतदार संघात फिरून मतदाराला संभ्रमित करण्याचं काम करीत आहे का?

या उमेदवारांचा वापर करून वेळ पडल्यास भा.ज.पा प्रायोजित उमेदवार (स्पॉन्सर कँडिडेट) उभे करून विरोधकांना भेटणाऱ्या मतदान मध्ये भगदाळ पाळू शकते का?

कारण अशीच काहीशी शक्कल भारतीय जनता पक्षाने सध्या हरियाना व जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत वापरली होती.

अशीच रणनीती मूर्तिजापूर बार्शीटाकळी मतदारसंघ व संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे का ? येणाऱ्या काळात हे बघणे आता रोचक झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!