Join WhatsApp group

Ads

अकोला जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा संपन्न..

By Sarkarmzanews

October 6, 2024 9:05 am

Ads

अकोला:- दिं 30 सप्टेंबर 2024 रोजी वंसत देसाई स्टेडियम अकोला येथे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व ऑल अकोला जिल्हा वुशू स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा आयोजित करण्यात आली

या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट सर तसेच अकोला जिल्हा वुशू स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अँड.पप्पू मोरवाल सर तसेच ऑल अकोला जिल्हा वुशु स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव तथाप्रशिक्षक मनोज बी.अंबेरे सर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच मुख्य पंच म्हणून लाभलेले वर्धा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राऊत सर,रेफरी पॅनल मध्ये प्रेम वाघमारे, अभिषेक सोनवणे,आकाश करवते,साक्षी तायडे,सर्वज्ञा काकड,जयेश आगरकर या सर्व पंचांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील शालेय वुशू स्पर्धा मोठा जल्लोषात पार पडल्या. विजेत्या स्पर्धकांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!