Join Whatsapp

जाहिरातबाजी बघून जनता साबण, तेलडबे निवडते, सरकार नाही.खा.अमोल कोल्हे दहिवडीत शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा

Photo of author

By Sir

Share

गोंदवले नवनाथ भिसे जिल्हा प्रतिनिधी :५७० कोटी जाहिरातीसाठी या सरकारने खर्च केलेत. हे फक्त जाहिरातबाजी करणारे सरकार आहे.मात्र जाहिरातबाजी बघून जनता फक्त साबण, तेलडबे गृहउपयोगी साहित्य निवडते सरकार नाही निवडत असे प्रतिपादन खा. अमोल कोल्हे यांनी माण खटाव विधानसभा मतदार संघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने केले.

यावेळी उपस्थित प्रभाकर देशमुख,अभयसिंह जगताप, अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने,संदीप मांडवे, डॉ.महादेव कापसे,विपुल गोडसे, सुनील गव्हाणे,अर्जुन खाडे, डॉ. महेश माने. मकरंद बोडके, सौ.कविता देशमुख, सौ.शालन जाधव,नगरसेवक महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले भारतीय जनता पार्टीने ईडी सीबीआयचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु या दहशतीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने न जुमानता लोकसभेला स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता झुकत नाही हे दाखवून दिले आता विधानसभेलाही जनता या दहशतीला जुमानणार नाही हे यंदाच्या लोकसभेला जनतेने दाखवून दिले आहे .

हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर तारकाट आणि खड्डे करून आणि अश्रू धूर सोडून अन्याय केला ही सरकार हिच परिस्थिती महाराष्ट्र मध्ये देखील आणेल,पक्ष फोडू महाराष्ट्र,शेतकऱ्यांना कधीही न्याय दिला नाही. म्हणून या सरकारच्या राजकीय स्वप्नांना धूळ चारण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

आता येणारी निवडणुक भाजपाला चले जाव म्हणण्याची आहे. जयंत पाटील म्हणाले की मी मंत्री असताना कलेढोण आणि परिसरातील ४८ गावांना पाणी देण्याचे काम मी केले आहे.२.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आमचे सरकार गेले आणि नवीन सरकारने विलंब लावला. या सरकारला १५ वर्षात जिहे कटापूर योजना पूर्ण करता आले नाही.

मागील वर्षी आंधळी धरण भरले आणि ऐन दुष्काळात जनता मागणी करत असताना पाणी दिले नाही. याउलट जी ग्रामपंचायत माझ्याबरोबर नाही त्यांना पाणी द्यायचे नाही असे धोरण आखले. सरकारच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार करतायेत.

कोरोना काळात मृत माणसांना उपचार करून घरी पाठवले असा रिपोर्ट बनवून कोठ्यावधी रुपये लाटले.राजेवाडी तलावातील शेतकऱ्यांच्या हक्काची माती एका विशिष्ट संस्थेच्या नावाखाली परस्पर विकण्यात आली. असे प्रतिपादन त्यांनी केले.

महाराष्ट्रात अनेत नेते तुतारीची मागणी करतायेत दररोज पवार साहेबांना भेटण्यासाठी मिटिंग घेतायेत. ८४ वर्षाचा योद्धा महाराष्ट्रभर फिरतोय आता परिवर्तन अटळ आहे.लोकसभेला धूळ चारली आता विधानसभेला धूळ चारा राज्यात आपले सरकार येणार यात शंका नाही.

उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले की मी या मतदार संघाचा निरीक्षक आहे मतदार संघात फिरत असताना अनेक ठिकाणी ऐकायला मिळाले की प्रशासनाला वेठीस धरून येथील लोकप्रतिनिधी त्रास देतायेत परंतु या लोकप्रतिनिधीला घरी बसविण्यासाठी तुम्ही सर्वजण एकजूट करा.मी पण तुमच्या बरोबर आहे. अनेकजण इच्छुक आहेत.

परंतु पवार साहेब एकच उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभा रहा येथील आमदार तुमच्या विचाराचा असेला असे प्रतिपादन त्यांनी केले शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की माण खटाव मधून अनेकजण इच्छुक असल्यामुळे तिकीट कोणाला द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावरून लक्षात येते की तुतारीची ताकद या मतदार संघात आहे आणि आमदार आपलाच होणार हे निश्चित.१० वर्षात भाजपाने व्यवसाय केला माणूस माणसात ठेवला नाही. म्हणून जनतेने लोकसभेला त्यांना जागा दाखविली.

आता विधानसभे ला देखील जनता जागा दाखवेल. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही.विकासकामे बाजूला ठेवा आणि गोरगरिबांना त्रास देणारा भाजपला हद्दपार करा. असे आव्हान त्यांनी केले.प्रभाकर देशमुख म्हणाले की मी जलसंधारण सचिव असताना कोठ्यावधीची कामे केली. सत्तेचा दुरुपयोग करून लोकप्रतिनिधीनी खिसे भरण्याचे काम केले. अवैध व्यवसायीकांना पाठबळ दिले.

आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे.अभयसिंह जगताप म्हणाले की सर्वसामान्यांचे सरकार यावे जनतेची अपेक्षा आहे.या मतदार संघाचे पाणी भाजपने आडविले. लोकप्रतिनिधीनी फक्त लोकांच्या जमिनी हपडण्याचे आणि मयताचे पैसे खाण्याचे काम केले. या सरकारच्या काळात माता भगिनी सुरक्षित नाहीत. पवार साहेबांनी राजकारणात कधीही निष्ठा सोडली नाही परंतु भाजपने राजकारण खालच्या पातळीवर पोहचवले.म्हणूनच आता परिवर्तन जनताच करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनिल देसाई बोलताना म्हणाले की १५ वर्षाचे गुऱ्हाळ आता बंद करायचे आहे. आता कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.असे माण तालुक्याच्या राक्षसाचा वध केल्याशिवाय आता राहणार नाही. असे प्रतिपादन त्यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!