Join WhatsApp group

निशुल्क विशेष मार्गदर्शन व तपासणी शिबिर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

*मुर्तीजापुर (प्रतिनिधी) – पश्चिम विदर्भातील सुप्रसिद्ध रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिलीटेशन सेंटर अमरावती द्वारे मुर्तीजापुर मध्ये मिरगी ,फीट, अपस्मार, एपीलेपसी, डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येणे, लकवा, पॅलेसिस, स्ट्रोक, डोक्याला मार लागणे, ट्रॉमा , मानेचे व मणक्याचे दुखणे, स्पाईन प्रॉब्लेम ,ब्रेन ट्युमर, विसरभोळेपणा, कंपवात इत्यादी विविध आजारांवर निशुल्क मार्गदर्शन व तपासणी शिबिर चे आयोजन मुर्तीजापुर शहर मध्ये रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०ते १वाजेपर्यंत सिंधी समाज भवन ,सिंधी कॉलनी, सरकारी दवाखान्या मागे ,मूर्तिजापूर येथे करण्यात आलेले आहे.

या मार्गदर्शन शिबिर मध्ये सुप्रसिद्ध ख्यातीप्राप्त न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिकंदर अडवाणी आणि प्रसिध्द न्यूरोसर्जन डॉ. आनंद काकानी हे रुग्णांना निशुल्क मार्गदर्शन करतील. तसेच काही गरजू रुग्णांना औषधे सुद्धा मोफत देण्यात येतील. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!