Join Whatsapp

जम्मू येथे सुरू असलेल्या सब ज्युनियर टेनिक्वाईट नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राचा वर्चस्व

Photo of author

By Sir

Share

वाशिम – मुलांच्या एकेरी प्रकारात महाराष्ट्राच्या उत्कर्ष पुणेवार* याने आपला जोडीदार महाराष्ट्राच्या नैतिक वर्माचा* पराभव करून प्रथम क्रमांक मिळवून इंडिया नंबर एक व सुवर्ण पदकाचा मान मिळविला व महाराष्ट्राच्याच *नैतिक वर्मा रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

दुहेरी प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींच्या जोडीने ( इशिका मिश्रा व अंकिता बोंबाटे )चतुर्थ क्रमांक मिळविला.मिश्र दुहेरी प्रकारात महाराष्ट्राच्या जोडीने ( कृष्णा चिलेवार व आस्था मिश्रा) तामिळनाडूच्या जोडीवर मात करून तृतीय क्रमांक पटकावला उत्कर्ष पुणे वार , नैतिक वर्मा, कृष्णा चीले वार, हे खेळाडू वाशीम जिल्ह्यातील आहेत.

तसेच मनस्वी ताठे, आस्था मिश्रा, व इशिका मिश्रा हया खेळाडू सुद्धा वाशीम जिल्ह्यातील आहेत.

राष्ट्रीय स्पर्धा करीता मुलांच्या गटात महाराष्ट्र संघात 6 पैकी 3 मुले वाशीम जिल्हा Tennikoit संघटनेचे खेळाडू.तसेच मुलींच्या गटात सुद्धा महाराष्ट्र संघात 6 पैकी 3 मुली वाशीम जिल्हा संघटनेचे खेळाडू आहे.

या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री किशोर बोंडे, लोकमान्य व्यायाम शाळा कारंजा चे सदस्य श्री गोपाल भाऊ राऊत, आनंद पेंटे सर,विजय मोटघरे वाशीम जिल्हा टेनिकवाईट अध्यक्ष श्री दीपक भाऊ भांदूर्गे,संघटनेचे सचिव संजय शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!