Join WhatsApp group

Ads

अकोल्याची कन्या पूनम कैथवास महाराष्ट्रच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

By Sarkarmzanews

October 4, 2024 8:08 pm

Ads

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचानालाय महाराष्ट्र राज्य च्या वतीने कुमारी पुनम कैथवासला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र राज्य तर्फे घोषित करण्यात आला आहे.

प्रत्येक प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये आजपर्यंत या लेकीने महाराष्ट्राला व देशाला अनेक पदके मिळवून दिली तसेच जिल्हास्तरीय स्पर्धा असो राष्ट्रीय स्पर्धा असो युथ राष्ट्रीय स्पर्धा असो ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अशा अनेक स्पर्धेमध्ये पूनमने प्रत्येक वेळी आपली चांगली कामगिरी बजावलेली आहे

तसेच पूनमला जिल्हा क्रीडाभूषण पुरस्कार 2023-24 व अमरावती विद्यापीठातील सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू हे पण सन्मान पूनमला आजपर्यंत प्राप्त झाले आहे

बॉक्सिंग कोच सतीशचंद्र भट सहाय्यक प्रशिक्षक आदित्य मने यांच्या मार्गदर्शनामध्ये आजपर्यंत तिने आपल्या सराव केला आहे तसेच पूनमच्या यशाच्या पाठीमागे क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे क्रीडापीठ प्रमुख सुहास पाटील माननीय उपसंचालक संजय सबनीस विजय संतान अशा खूप लोकांनी तिला आजपर्यंत सहकार्य केले असून पूनमने आपल्या आई-वडिलांसह या सगळ्या मंडळीला या पुरस्काराचे श्रेय दिलेले आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!