Join Whatsapp

सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनांवर गंभीर प्रश्न चिन्ह ?

Photo of author

By Sir

Share

निवडणुका जिंकण्यासाठी सध्या शिंदे सरकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योजनेचा सपाटा लावला असून त्या वरचा ताण महाराष्ट्रच्या तिजोरी वर पडत आहे.

या होत असलेल्या उधडम पट्टी मुळे राज्याची तिजोरी जवडपास रिकामी झाल्याचे चित्र दिसत आहे. तिजोरी ठण ठण गोपाल असतानाही मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री विविध घोषणांचा वर्षाव जनतेवर करत आहे.

सोमवारच्या बैठकीत अजिदादांनी राज्याचा महसूली विभागात घट व उत्पन्न याची वजाबाकी करून सहकारी मंत्री महोदयांना सांगितली व समोर येणाऱ्या आर्थिक भाराची परिस्थिती समजून सांगितली पण सहकारी मंत्री या गोष्टी समजण्यासाठी तयार नव्हते.

अजित दादांनी त्यांना खडे बोल सुनावले.अशा भराभर निर्णय घेऊ नका राज्याची आर्थिक परिस्थिती किती चिंताजनक झाली आहे तुम्हाला माहिती आहे का?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढच्या महिन्याचे वेतन देता येणार की नाही? याची मला खात्री नाही याबाबत मला शंका आहे.

अजित पवारांनी या अगोदर पण अंथरून पाहून पाय पसरवण्याचा सल्ला दिला होता.

पण मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी या गोष्टीला गंभीरपणे घेतले नाही व लाडकी बहीण व विविध योजनांवर त्यांनी भर दिला असून सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनांवर सध्या गंभीर प्रश्न चिन्ह उभा झाला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!