Join WhatsApp group

Ads

अमरावती विभागीय शालेय हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा 14 वर्ष मुले-मुलींमध्ये अमरावती ग्रामीण संघ राज्यस्तरावर.

By Sarkarmzanews

October 1, 2024 8:07 pm

Ads


अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा घेण्यात आले.14 वर्ष मुलांच्या वयोगटात अंतिम सामना अमरावती ग्रामीण आणि बुलढाणा या संघात झाला या अटीतटीच्या सामन्यात अमरावती ग्रामीण संघ 25-20,18-25,15-8अशा फरकाने अंतिम सामना जिंकला व राज्यस्तरीय हॉलिबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला.

त्याच प्रमाणे 14 वर्ष मुलींच्या वयोगटात अमरावती ग्रामीण व यवतमाळ या संघात अंतिम सामना झाला, यामध्ये अमरावती ग्रामीण संघ 25-16,12-25,7-15 अशा फरकाने जिंकला.मुलांच्या वयोगटात उपविजयी बुलढाणा संघ ठरला तर तृतीय स्थानावर यवतमाळ संघ राहिला,

तसेच मुलींच्या वयोगटात उपविजयी यवतमाळ संघ उपविजयी राहिला तर तृतीय स्थानावर अमरावती मनपा संघ राहिला. निवड समिती सदस्य म्हणून राक्रीमा राहुल निवडुंगे (अमरावती ), संतोष गजभिये, नितीन वाघमारे (एन. आय. एस.हॉलिबॉल ), सचिन निलगिरे हे होते.स्पर्धेत पंच म्हणून प्रमोद पाटील, वैभव देहलिवाले, सचिन निलगिरे, निशांत वानखडे, अभिजित गोमासे,विक्की पवार, अभिलाष बडगे, नितेश वासनिक, कार्तिक वानखडे,कृष्णा सराफी,संतोष धामणे, इत्यादीनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी श्रीमती मनीषा ठाकरे,राक्रीमा सुरजकुमार दुबे, राक्रीमा अमर जाधव, राक्रीमा श्रीमती नलिनी जाधव, जिल्हा संघटक राजेश गावंडे, राजू उगवेकर हे परिश्रम घेत आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट कळवितात.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!