Join Whatsapp

पंचनामा विधानसभा निवडणुकीचा सोसल तेवढंच बोलावं

Photo of author

By Sir

Share

महत्वकांक्षी माणूस सत्तेवर आल्यानंतर भ्रष्ट, तत्वहिन आणि मग्रूर होत जातो. त्याला वाटतं सगळं मलाच मिळावं.मी मंत्री असेल तर माझी बायको खासदार असावी,मुलगा आमदार असावा,मुलगी जिल्हा परिषदेत जावी आणि सुनही पंचायत समिती सभापती असावी.त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊन राजकारण करतो.भ्रष्टचार रक्तात भिनलेला असल्याने भ्रष्ट मार्गाने सगळी पदे पदरात पाडून घेतो.ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर तो मंत्री झाला,त्या कार्यकर्त्यांन पैकी कुणी पंचायत समिती सदस्य व्हावा असे तो कधीच मानत नाही.कारण अंगी असलेल्या मग्रूरीमुळे तो कार्यकर्त्यांना तुच्छ समजायला लागतो.

बरं हा स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम केलेला माणूस असतो.याला स्वतःला कार्यकर्त्यांच्या भावना माहीत असतात.पण त्या समजून घेण्याची दानत आता त्याच्यात उरत नाही.गोष्ट अशाच एका भ्रष्ट,मग्रूर आपमतलबी माणसाची आहे.गोष्ट महाराष्ट्रातील विधानसभेतील एका काँग्रेस नेत्याची आहे.गोष्ट पूर्ण ऐकली की तुम्ही समजून जाल मी कुणाबद्दल बोलतोय.गोष्ट जूनी आहे.एका बड्या नेत्याच्या बैठकीत एक गरीब पण तितकाच महत्त्वाकांक्षी माणूस दिवस रात्र पडून असायचा.त्याकाळी त्याच्याकडे दारूसाठी पण पैसा नसायचा.

संध्याकाळच्या नाईंटीची सोय करण्यासाठी म्हणून मग हा त्या बड्या नेत्यांच्या बैठकीत तो बडा नेता सांगेल ते काम करायचा.त्यातून मिळालेल्या पाच दहा रुपयांत याचे संध्याकाळचे मदीरा प्राशन उरकायचे.अशी त्याची रोजची दिनचर्या होती.पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या.हा घरगडी कम कार्यकर्ता आता त्या बड्या नेत्याचा लाडका बनला होता.पंचायत समितीची जागा एससी आरक्षित होती.त्या बड्या नेत्याच्या हातात सगळी तिकीटे होती.त्यांनी इतरांना देण्यापेक्षा आपल्याच या सांगकाम्या कार्यकर्त्याला पंचायत समितीचे टिकीट दिले.काँग्रेस तळागाळात पोहचलेली तो काळ होता,त्याकाळी काँग्रेसने दिलेला दगडही निवडून यायचा…

तसा हा धोंडाही निवडून आला.पहिल्याच प्रयत्नात पास झालेल्या या गड्याला वाटले आपणच फार अभ्यासू आहोत,पण तसे नव्हते.आरक्षित जागा आणि काँग्रेस सारखा मोठा पक्ष या दोन गोष्टींमुळे हा पास झाला होता.थोडक्यात पेपर सोपा होता.आणि अशा प्रकारे एक सामान्य कार्यकर्ता जरा मोठा झाला होता.नंतरच्या काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक लागली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद एससी आरक्षित होते.इकडे विधानसभेमध्ये यांचा जिल्हा परिषद गट एससी महिलांसाठी आरक्षित होता.परत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने या सांगकाम्या माणसाच्या पत्नीला टिकिट दिले.पक्षाची ताकद वापरून पत्नी निवडून पण आली.

त्यावेळी एससी आरक्षित जागेवरून जिल्ह्यात दोन जागा निवडून आल्या होत्या.राष्ट्रीय नेत्यांची पूर्ण काँग्रेसवर पकड असलेला हा काळ होता.जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी याष्ट्रीय नेत्यानी या दोन एससी आरक्षित मंडळींपैकी कोण आपल्या शब्दांच्या बाहेर जाणार नाही,ते हरले आणि परत एकदा या सांगकाम्याची लाॅटरी लागली.

पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष झाली.तोवर याची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती.जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे झाले तरी हा इतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा सदरा घालून जायचा.मिटींग संपली की तो सदरा परत करायचा.काँग्रेसमध्ये आता अशोक चव्हाण पर्व सुरू झाले होते.तो काळ होता २००८-१०.राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूकीच्या रिंगणात उतरली होती.

विधानसभेची जागा एससी आरक्षित झाल्यामुळे मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते चिंतेत होते.काँग्रेसकडे हा सांगकाम्या ऑलरेडी असल्यामुळे काँग्रेस नेतृत्व थोडे कमी चिंतेत होते.काँग्रेसकडे अजूनही एक दोन ऑप्शन्स होते,पण पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या या कार्यकर्त्याची ताकद बऱ्यापैकी वाढली होती,ती ताकद वापरून याने विधानसभेचे टिकीट मिळवले.आणि विधानसभा जिंकली सुद्धा.अर्थात अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या हेतूने मराठावाडा विदर्भातील बऱ्याच मतदारसंघात मतदान झाले होते.आमदार झाल्यावर गडी सुसाट सुटला.

स्थानिक काँग्रेस नेतृत्वात मिळेल ते काम करणारा माणूस आता मात्र काँग्रेसच्या मराठा नेतृत्वाला आव्हान देऊ लागला.यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मराठा,बंजारा समाजावर खोट्या ऍट्रोसिटी केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या.काही प्रकरणे सामंजस्याने तोडगा काढण्यासारखी होती त्यातही यांनी स्थानिक मराठा नेतृत्वाचे ऐकले नाही.हा माणूस बाहेरून कसाही दिसला तरी पराकोटीचा मराठा द्वेष मनात ठेवून होता.त्याचा फटका त्याला पुढच्या दोन्ही निवडणूकांत बसला.त्यांचे वैयक्तिक नुकसान झालेच,

पण यामुळे पक्षाचे दोन टर्म मोठे नुकसान झाले.पक्षाविषयी जनमानसात चुकीचे गैरसमज पसरले.याने याच्या राजकीय कारकीर्दीत जनतेला काय दिले?दिले ना,एक मग्रूर मुलगा.एकतर याचे कर्तृत्व शून्य,वरून बापाचे मतदारसंघाच्या विकासात योगदान शून्य आणि हा एका मराठा लोकनेत्याच्या मुलाला जातीय द्वेषातून कमी लेखण्याचा प्रयत्न करतो?

उमरखेड पंचायत समितीत याने या मग्रूर मुलाला टिकीट देऊन निवडून आणले.यावेळी यांना कार्यकर्ते आठवले नाहीत,स्वतःच्या पुत्रालाच पुढे केले.२.५ वर्षांनंतर सभापती बदलाच्या वेळी मुलाला सभापती करण्यात हेच अग्रेसर होते,पण यांनी तसे जाणवू दिले नाही.जागा ओपन होती,एक मराठा सभापती होणार होता.सगळी काँग्रेस अनुकूल होती.यांनी पोराकरवी बंडखोरी करवून आणली.आणि भाषणात मात्र बंडखोर मुलगा माझ्या रक्ताचाच नसल्याची निर्लज्ज,घरच्या लक्ष्मीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी कबुली दिली.आता हाच कार्यकर्त्याचा नेता झालेला माणूस काँग्रेसकडून विधानसभा टिकीट मागतोय.

मागच्या दोन निवडणूकांत हरल्यावर पक्षाचे झालेले नुकसान यांनी भरून काढले नाही.टिकीट मागायला मात्र पुढे आहेत.मला नाहीतर माझ्या मुलाला द्या,अशी मागणी करताना हे महाशय दिसत आहेत.मग हा मुलगा तेव्हा यांच्या रक्ताचा नव्हता,आता कसा डीएनए एक झाला?काँग्रेस पक्षाने कधीच जात पात धर्म मानला नाही.कधी धर्माचे राजकारण पण केले नाही.आताही काँग्रेसने या जातीवादी माणसाला दूर सारून नव्या दमाच्या सर्वसमावेशक सहिष्णू चेहऱ्याचा विचार करावा.किमान विकासात्मक दृष्टीचा माणूस आमचा आमदार झाला पाहिजे.

उमरखेड विधानसभेत आता सांगकामे आमदार नकोच.सध्याचे भाजप आमदार किती सक्षम आणि स्वतंत्र आहेत आपण बघतच आहोत.हे आमदार असून सगळी सूत्रे यांच्या कारभाऱ्याच्या हाती आहेत.अशा परिस्थितीत काय नि कुणाचा विकास होणार आहे?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!