Join WhatsApp group

Ads

मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अकोल्यात दोन आस्थापनांवर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

By Sarkarmzanews

October 25, 2026 10:32 am

Ads

अकोला : अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत निर्धारित तरतुदींचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अकोला शहरातील दोन अन्न व्यावसायिकांची तपासणी केली.

तपासणी दरम्यान काही अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, प्राथमिकदृष्ट्या आढळून आलेल्या त्रुटी व नियमांच्या कथित उल्लंघनाच्या अनुषंगाने संबंधित साठ्यावर जप्तीची तसेच परवान्याबाबत प्रशासकीय कारवाई करण्यात आली.एमआयडीसी फेज-३ जवळ कुंभारी येथील मे. राजकुवर ट्रेडर्स येथे तपासणी करण्यात आली. यावेळी काळा मसाला (सुगरण) व धनीया पावडर या दोन अन्न पदार्थांचे नमुने अधिकृतपणे घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आले.

तसेच लेबलिंगसंदर्भातील त्रुटी प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याने उर्वरित साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याची अंदाजे किंमत ३ लाख ८२ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तपासणीच्या वेळी संबंधित आस्थापनाकडे वैध अन्न नोंदणी/परवाना उपलब्ध नसल्याचे तसेच आवश्यक तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती नसल्याचे निदर्शनास आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

याशिवाय FSMS प्लॅन, न्यूट्रिशनल फॅक्ट्ससंबंधी अभिलेख, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अन्न पदार्थांचे विश्लेषण अहवाल, पेस्ट कंट्रोल, FIFO, साफसफाई व कच्च्या मालासंदर्भातील अभिलेख उपलब्ध नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले.

तसेच कच्चे व तयार अन्न पदार्थ निर्धारित पद्धतीने पॅलेटवर न ठेवता जमिनीवर ठेवणे, खिडक्यांना आवश्यक बारीक जाळी नसणे, कामगारांकडून डोक्यावर कॅपचा वापर न होणे, पॅकिंग मटेरियलचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र उपलब्ध नसणे आणि स्टॉक रजिस्टर नसणे आदी बाबी शेड्यूल-४ मधील संबंधित स्वच्छता व कार्यपद्धतीच्या अटींच्या अनुपालनाबाबत त्रुटी असल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर संबंधित व्यवसायास बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.दरम्यान, मे. टोपली अॅण्ड सन्स, प्लॉट क्र. एन-१६०, एमआयडीसी फेज-४, अकोला येथेही विभागाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी मिरची पावडर, धनीया पावडर आणि काळा मसाला या तीन अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

याशिवाय काळा मसाला (मुस्कान), काळा वाटण मसाला व स्पेशियल कांदा-लसूण मसाला या अन्न पदार्थांचा एकूण २१० किलो वजनाचा व ५२ हजार ५०० रुपये किमतीचा साठा ताब्यात घेण्यात आला. संबंधित अन्न पदार्थांच्या अवेष्टनावरील लेबलवर घटकांचे प्रमाण आवश्यक त्या पद्धतीने नमूद नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याचे विभागाने नमूद केले आहे. तसेच सदर अन्न पदार्थांचा दर्जा व लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्याने पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने साठा जप्त करण्यात आला.

यासंदर्भात फॉर्म २ व ३ मधील आवश्यक कार्यवाही पूर्ण करून साठा संबंधित अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तपासणीमध्ये या आस्थापनाकडेही तांत्रिक व्यक्ती नसणे, FSMS प्लॅन व विविध आवश्यक अभिलेख उपलब्ध नसणे, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, पेस्ट कंट्रोल, FIFO, साफसफाई व कच्च्या मालाचे अभिलेख उपलब्ध नसणे, अन्न पदार्थांची साठवणूक व स्वच्छतेसंदर्भातील निर्धारित पद्धतींचे पालन न झाल्याचे दिसून येणे, खिडक्यांना आवश्यक जाळी नसणे, पॅकिंग मटेरियलचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र उपलब्ध नसणे आणि स्टॉक रजिस्टर नसणे आदी बाबी निदर्शनास आल्या.

वरील बाबींच्या अनुषंगाने शेड्यूल-४ मधील संबंधित अटींच्या अनुपालनात त्रुटी आढळून आल्याने, संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्याची प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली आहे.

दरम्यान, अन्न पदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

त्यामुळे संबंधित अन्न पदार्थ नियमबाह्य किंवा भेसळयुक्त असल्याचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळा अहवाल व सक्षम प्राधिकरणाच्या पुढील कार्यवाहीपूर्वी काढता येणार नाही.ही कारवाई मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे व अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार करण्यात आली.

अकोला सहायक आयुक्त देवानंद वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके व किशोर बोरचाटे यांनी ही कारवाई केली.

न्यूज फोटो – AI GENRATED

Related Article

खाणमालकच खाणमालकांच्या विरोधात? पडद्यामागे नेमकी ‘भानगड’ काय?सहा मीटरचा नियम, ३० मीटर उत्खननाचा दावा अन् ब्लास्टिंगचा मुद्दा; कोण कोणाला लक्ष्य करत आहेत?

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!