Join WhatsApp group

Ads

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

By Sarkarmzanews

October 11, 2026 7:29 pm

Ads

“नाकाबंदीत एक कोयता सापडला म्हणून कारवाई संपत नाही; त्या एका कोयत्यामागे ६२ कोयते सापडले आहेत. आता प्रश्न एवढाच—अकोला शहरात अजून किती ‘६३’ लपलेले आहेत?”

अकोला : शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या नाकाबंदीत अकोला पोलिसांच्या हाती तब्बल ६३ लोखंडी कोयत्यांचा साठा लागल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, केवळ एका कोयत्यासह दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांची तपासणी करताना संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने पुढील तपासाची दिशा दुकानापर्यंत पोहोचली आणि तब्बल ६२ कोयते जप्त करण्यात आले.

१० ऑक्टोबर रोजी रात्री सरकारी बगीच्यासमोर नाकाबंदी सुरू असताना वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके आणि पोलीस हवालदार अश्वीन चव्हाण कर्तव्यावर होते. विना नंबर प्लेट सुझुकी अॅक्सेसवरून जाणाऱ्या दोघांना थांबविल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. वाहनाची तपासणी केली असता डिक्कीत एक मोठा लोखंडी कोयता आढळून आला.

अरेरावीमुळे संशय अधिकच बळावला?

पोलिसांच्या माहितीनुसार, कोयत्याबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीकडून तो लोहा बाजारातील दुकानातून घेतल्याची माहिती मिळाली. नाकाबंदीच्या ठिकाणी झालेल्या अरेरावीच्या वर्तनामुळेही पोलिसांचा संशय अधिक गडद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिसांना दिशा दिली.

त्यानंतर शहर पोलिसांनी पंचांसमक्ष लोहा बाजारातील प्रिन्स हार्डवेअर या दुकानाची तपासणी केली असता एका बोरीमध्ये तब्बल ६२ लोखंडी कोयते आढळून आले.

एका कोयत्यापासून ६२ कोयत्यांपर्यंत तपास

मुजम्मील खान युनूस खान आणि सैय्यद फिरोज सैय्यद जानी यांच्याकडून एक कोयता, तर दुकानातून ६२ कोयते असा एकूण ६३ कोयत्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबत विना नंबर प्लेट असलेली सुझुकी अॅक्सेस मोपेडही जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६२ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमातील कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण सोळंके यांची सतर्कता ठरली महत्त्वाची

नाकाबंदी ही केवळ वाहतूक तपासणीपुरती मर्यादित न राहता शहरातील संभाव्य गुन्हेगारीचे धागेदोरे उघड करणारी ठरली. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांनी वाहन थांबवून केलेली बारकाईने तपासणी आणि संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करण्याची भूमिका या कारवाईतील महत्त्वाचा टप्पा ठरली.

एका कोयत्याच्या तपासातून ६२ कोयत्यांचा साठा समोर येणे, ही बाब त्यांच्या सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्यातील अशा छोट्या वाटणाऱ्या निरीक्षणातून मोठ्या गुन्हेगारी शक्यतांना आळा घालता येतो, याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.

अकोल्यात अशी किती दुकाने? प्रशासनासमोर मोठा प्रश्न

या कारवाईनंतर अकोला शहरात शेतीची अवजारे आणि लोखंडी साहित्य विक्रीच्या नावाखाली धारदार शस्त्रसदृश साहित्याची विक्री करणारी आणखी किती दुकाने आहेत? त्यांच्याकडे आवश्यक परवानग्या व नोंदी आहेत का? विक्रीची नोंद ठेवली जाते का?

अल्पवयीन किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना अशा वस्तू विकल्या जात नाहीत ना? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या दुकानांपैकी किती दुकाने नियमानुसार परवानाधारक आहेत आणि किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे, याची पोलीस व संबंधित प्रशासनाने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कारण कोयता हा शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा अवजार असला तरी तो गुन्हेगारी कृत्यात वापरला गेल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील बाजारपेठांमध्ये अशा धारदार वस्तूंची विक्री आणि त्यांचा संभाव्य गैरवापर याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात कायदा-सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

‘सराईत’ आरोपींच्या पार्श्वभूमीचीही चौकशी गरजेची

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही आर्म्स अॅक्टसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या ६३ कोयत्यांचा नेमका उद्देश काय होता, त्यांची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

एक कोयता पकडला आणि ६३ कोयत्यांचा साठा समोर आला; आता पोलिसांच्या तपासाची दिशा या साठ्याच्या पुढे कुठपर्यंत पोहोचते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.

Related Article

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

दुष्काळाने हिरावला आणखी एक आधार; चिखली कासवीत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूसततची नापिकी, कर्जबाजारीपणाचे संकट

दुष्काळात टँकरच्या पाण्याचा हिशेब कोण देणार?

पत्रकार निखिल देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न?म्हैसांग येथील घटनेने खळबळ

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!