Join WhatsApp group

Ads

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

By Sarkarmzanews

October 11, 2026 8:49 am

Ads

‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत छापा; पेट्रोल-डिझेलसह ७.११ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे ताब्यात

अकोला : शहरात पेट्रोल व डिझेलची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पातूर रोडवरील पाटनी कोल्ड स्टोअर येथे छापा टाकून पेट्रोल-डिझेलच्या कथित अवैध साठा व विक्रीप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद फैजान अब्दुल रज्जाक (रा. रियाज कॉलनी), दानिशखान परवेज खान (रा. चांदखॉ प्लॉट) आणि मोहम्मद समीर मोहम्मद हाशम (रा. हमजा प्लॉट), तिघेही अकोला, हे पेट्रोल व डिझेलचा साठा करून त्याची विक्री करत असल्याचे कारवाईदरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईत ५०० लिटर पेट्रोल (अंदाजे किंमत ५५ हजार रुपये), २०० लिटर डिझेल (२० हजार रुपये), १९० लिटर इथेनॉल (१५ हजार २०० रुपये), महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (अंदाजे ६ लाख रुपये) आणि रोख २१ हजार ५०० रुपये, असा एकूण ७ लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन जुने शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ सह भारतीय न्याय संहितेतील कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप पळसपगार तसेच पोलीस अंमलदार रविंद्र घिवे, विनय जाधव, मोहम्मद नदीम, प्रफुल बांगर आणि गोपाल बायस्कर यांनी केली.

सरकार माझा न्यूजचा सवाल

इंधनाची अशा प्रकारे अवैध विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत असतील, तर अशा साठ्यांचे स्रोत, पुरवठा साखळी आणि इंधन नेमके कुठून आणले जात होते, याचाही तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. केवळ साठा जप्त करण्यापेक्षा या व्यवहारामागील संपूर्ण यंत्रणा तपासली जाते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Article

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

दुष्काळाने हिरावला आणखी एक आधार; चिखली कासवीत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूसततची नापिकी, कर्जबाजारीपणाचे संकट

दुष्काळात टँकरच्या पाण्याचा हिशेब कोण देणार?

पत्रकार निखिल देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न?म्हैसांग येथील घटनेने खळबळ

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!