Join WhatsApp group

Ads

जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत विविध वयोगटांत चुरशीच्या लढती

By Sarkarmzanews

September 21, 2026 9:49 am

Ads

शालेय व ग्रामीण विभागातील खेळाडूंचा सहभाग; विविध संघांची उल्लेखनीय कामगिरी

अकोला : १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील शालेय आणि ग्रामीण विभागातील खेळाडूंनी विविध वयोगटांत सहभाग नोंदवत क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. मुला-मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांमध्ये सामने घेण्यात आले.

शालेय विभागातील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सुफ्फा इंग्लिश स्कूलने प्रथम, मिलिंद विद्यालयाने द्वितीय तर नोएल स्टेट बोर्डने तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सुफ्फा इंग्लिश स्कूल प्रथम, मिलिंद विद्यालय द्वितीय आणि इंदिरादेवी खंडेलवाल तृतीय ठरले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात शिवाजी महाविद्यालयाने प्रथम, स्कूल ऑफ स्कॉलर्सने द्वितीय आणि मिलिंद विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला.

मुलींच्या शालेय विभागात १४ वर्षांखालील गटात मिलिंद विद्यालय प्रथम, कोठारी कॉन्व्हेंट द्वितीय आणि नोएल स्टेट बोर्ड तृतीय राहिले. १७ वर्षांखालील गटात मिलिंद विद्यालय प्रथम, इंदिरादेवी खंडेलवाल द्वितीय आणि नोएल स्टेट बोर्ड तृतीय ठरले. १९ वर्षांखालील गटात मिलिंद विद्यालयाने प्रथम, इंदिरादेवी खंडेलवालने द्वितीय तर नोएल स्टेट बोर्डने तृतीय क्रमांक मिळविला.

ग्रामीण विभागातील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सरला राम काकाणी, मूर्तिजापूर प्रथम तर किड्स पॅराडाईज, पातूर द्वितीय ठरले. १७ वर्षांखालील मुलांमध्ये किड्स पॅराडाईज, पातूरने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात शहा बाबू विद्यालय प्रथम, शिवाजी विद्यालय, गोरेगाव द्वितीय आणि सरला राम काकाणी, मूर्तिजापूर तृतीय ठरले.

ग्रामीण विभागातील १४ वर्षांखालील मुलींच्या गटात किड्स पॅराडाईज, पातूर प्रथम तर सरला राम काकाणी द्वितीय ठरले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात सरला राम काकाणी, मूर्तिजापूर प्रथम तर ज्युबिली इंग्लिश स्कूल, कुंभारी द्वितीय ठरले.

स्पर्धेच्या सामन्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला श्री. सतीशचंद्र भट्ट, क्रीडा अधिकारी संजय दुबे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय देशमुख, अकोला जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रेमराज शर्मा, संघटनेचे सचिव श्री. ज्ञानेश्वर ताले, संघटनेचे सदस्य श्री. मनीष अलगुलवार, तसेच श्री. पुष्पराज गावंडे, श्री. महादेव लिलो आणि श्री. पवन वसे, अमित मनवर, खंडारे सर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.सामन्यांचे पंच व अधिकारी म्हणून श्री. विश्वजीत ठाकूर, श्री. सार्थक कडुसे आणि श्री. सुरा पाल्हाडे यांनी जबाबदारी पार पाडली.स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री. अजिंक्य ढेवळे, श्री. निशांत वानखडे, श्री. गजानन चाटसे आणि श्री. रहीम खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

शालेय स्तरावरील अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळाचा अनुभव मिळत असून, रग्बी खेळाच्या विकासासाठी जिल्ह्यातील शाळांमधील सहभाग वाढण्यास मदत होत आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, क्रीडा अधिकारी, आयोजक आणि सहकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!