Join WhatsApp group

Ads

महसूल पथकाच्या शासकीय वाहनाला धडक देऊन पसार झालेला आरोपी अटकेत; तीन जिल्ह्यांतून वर्षभरासाठी तडीपार

By Sarkarmzanews

September 3, 2026 10:51 am

Ads

माना : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या शासकीय वाहनाला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीला माना पोलिसांनी वाहनासह अटक केली. नयन महल्ले (रा. कोळसरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता मुर्तीजापूर तहसील कार्यालयाचे महसूल पथक लोणसना परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात गस्त घालत होते. यावेळी Tata 407 मधून वाळू वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.पथकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे नेले.

याचदरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महसूल विभागाच्या शासकीय वाहनाला धडक देत आरोपी वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून, Tata 407 मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली.

तिची किंमत सुमारे ६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी महसूल अधिकारी श्रीमती रेणुका अरविंद उंबरकर यांच्या तक्रारीवरून माना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नयन महल्ले याला वाहनासह अटक केली.तडीपार प्रस्तावावरही कारवाईपोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध अवैध वाळू चोरी व वाहतुकीच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, मुर्तीजापूर यांनी नयन महल्ले याला अकोला, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तसेच शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा माना पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला श्री. अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापूर श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार, पोहेकॉ मनोहर इंगळे (ब.नं. ९३५) व पोकॉ सुशील आठवले (ब.नं. ७०४) यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!