Join WhatsApp group

Ads

-

घनशानी कुटुंबाचा सवाल : आपल्या वार्डातील नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील, तर आम जनतेने न्यायासाठी कुणाकडे पाहायचे? उपोषणाचा 16वा दिवस

By Sarkarmzanews

September 2, 2026 12:08 pm

Ads

अकोला : खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कच्ची खोली परिसरात राहणारे निर्मल घनशानी आणि दिशा घनशानी हे आपल्या मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, १५ दिवस उलटूनही त्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्याने अखेर २ सप्टेंबरपासून दोघांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

घनशानी कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. तसेच भाजपा नेते व वार्ड क्रमांक १५ चे नगरसेवक हरीश रतनलाल अलीमचंदानी यांच्याकडेही मदतीची मागणी करण्यात आली.

अलीमचंदानी हे घनशानी कुटुंबाचे नातेवाईक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा निघेल, अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती.मात्र आंदोलनाला १५ दिवसांचा कालावधी उलटूनही प्रश्न कायम असल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेषतः नगरसेवक हरीश अलीमचंदानी हे कुटुंबीयांच्या प्रश्नात मध्यस्थी करून प्रशासनाकडून तोडगा काढून देतील का? याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

आता अन्नत्याग उपोषण; प्रशासनाची भूमिका काय?

१५ दिवसांच्या आंदोलनानंतरही मागण्यांवर निर्णय न झाल्याने घनशानी कुटुंबाने अन्नत्यागाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांमध्येही चर्चा सुरू असून, एखाद्या कुटुंबाला १५ दिवस आंदोलन करूनही आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी नेमके कोणत्या दरवाजावर दस्तक द्यायची? असा सवाल केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात नगरसेवक हरीश अलीमचंदानी हे घनशानी कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या समस्येवर सकारात्मक तोडगा काढून देतील, अशी अपेक्षा कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

आता अन्नत्याग उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर तोडगा काढते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!