Join WhatsApp group

Ads

अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा मोठा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त

By Sarkarmzanews

August 29, 2026 7:06 pm

Ads

MIDC परिसरातील दोन Repacker पेढ्यांवर कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने परवाने तात्काळ निलंबित

अकोला | प्रतिनिधीअन्न सुरक्षा आणि मानके नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अकोला येथील MIDC परिसरातील दोन खाद्यतेल पेढ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या तपासणीत दोन्ही आस्थापनांमध्ये विविध गंभीर त्रुटी आढळून आल्याचे अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण, MIDC अकोला या पेढीची तपासणी करून Refined Soyabean Oil (Shakti) चा अन्न नमुना घेण्यात आला.

उर्वरित साठ्याबाबत सैल तेल विक्री, प्रयोगशाळा उपलब्ध नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल नसणे तसेच पुनर्वापर व भेसळीच्या संशयासह इतर त्रुटी आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. संबंधित पेढीकडे Repacker Oil साठी परवाना असतानाही ट्रेडिंग होत असल्याचे तपासणीत निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत ३,४२८.४०० किलो खाद्यतेलाचा साठा, अंदाजे किंमत ₹६,२१,३००, जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.

त्याच दिवशी मे. Bharatkumar and Brothers, MIDC अकोला या पेढीचीही तपासणी करण्यात आली. येथे Refined Soyabean Oil (Loose) चा अन्न नमुना घेण्यात आला. उर्वरित साठ्याबाबत भेसळीचा संशय, प्रयोगशाळा अद्ययावत नसणे, सैल तेल विक्री करणे, प्रयोगशाळेचे अहवाल उपलब्ध नसणे तसेच इतर त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या ठिकाणाहून ३,५९८.४०० किलो खाद्यतेलाचा साठा, अंदाजे किंमत ₹५,६१,३५०, जप्त करण्यात आला. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी केली.

दोन्ही परवाने तात्काळ निलंबित

विशेष म्हणजे, दोन्ही आस्थापना Repacker Oil साठी परवानाधारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र तपासणीदरम्यान आढळून आलेल्या गंभीर त्रुटींच्या आधारे दोन्ही पेढ्यांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तात्काळ (Forthwith) निलंबित करण्यात आले आहेत.

दोन्ही कारवाया अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, मुंबई आणि सहआयुक्त सचिन केदारे, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त देवानंद वीर, अन्न व औषध प्रशासन, अकोला यांनी दिली आहे.

खाद्यतेलाच्या गुणवत्तेवर FDAची नजर

खाद्यतेल हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित जीवनावश्यक खाद्यपदार्थ असल्याने त्याच्या साठवणूक, विक्री, पुनर्पॅकिंग आणि गुणवत्तेबाबत नियमांचे पालन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. MIDC परिसरातील या कारवाईमुळे खाद्यतेल व्यवसायातील नियमपालनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील तपासणी व प्रयोगशाळा अहवालांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Article

“गुटखा पकडला तेव्हा अन्न विभाग पुढे; आरोपी अटकेत आला तेव्हा पोलिस पुढे… आता सत्याच्या तपासात कोण पुढे जाणार?”

अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा मोठा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त

‘POCSO केस मागे घ्या, मग घर देतो’चा दबाव? नातेवाईकांनी घराबाहेर काढल्याचा कुटुंबाचा आरोप; ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट; अनिशचा विहिरीत मृत्यू, तरुणी बचावली अन् नंतर विषप्राशनाची माहिती”

आयआयटी बॉम्बे येथून हिया अग्रवाल यांनी Honors सहित B.Tech. पदवी संपादन

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द;औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा घेणार फेरपरीक्षा घेणार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!