Join WhatsApp group

Ads

‘गौ सम्मान आव्हान अभियान’चे राज्य प्रभारींची पुंडलिक बाबा गौरक्षणाला सदिच्छा भेट

By Sarkarmzanews

August 26, 2026 10:50 am

Ads

मुर्तीजापूर : ‘गौ सम्मान आव्हान अभियान’चे राजस्थानमधील हल्दीघाटी येथून आलेले महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा गौरक्षा कार्यकर्त्यांनी मुर्तीजापूर शहरातील पुंडलिक बाबा गौरक्षणाला सदिच्छा भेट देत गोसेवा व गौरक्षणाच्या कार्याची पाहणी केली.

यावेळी गौरक्षणातील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत गोसेवा, गौरक्षण आणि समाजामध्ये गोवंशाबाबत जनजागृती करण्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गोसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान, सायंकाळी ६ वाजता मुर्तीजापूर येथील तिडके नगर परिसरातील श्रीराम मंदिरात गौरक्षक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चर्चासत्र व बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत गौरक्षणासमोरील विविध आव्हाने, गोसेवा, गोवंश संवर्धन तसेच जनजागृतीच्या माध्यमातून समाजाचा सहभाग वाढविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत गौरक्षा कार्यकर्त्यांनी आपले अनुभव व विचार मांडले.

गोवंशाच्या संरक्षणासाठी संघटितपणे आणि कायदेशीर मार्गाने कार्य करण्यावर यावेळी भर देण्यात आला. बैठकीच्या समारोपानंतर उपस्थित गौरक्षक व कार्यकर्त्यांनी गोसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला.या सदिच्छा भेटी व चर्चासत्रामुळे मुर्तीजापूर शहरातील गौरक्षा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!