Join WhatsApp group

Ads

मतभेद विसरून सर्व पत्रकार व समाज कल्याणासाठी संघटीत व्हा!…संजय एम.देशमुख

By Sarkarmzanews

August 19, 2026 5:28 pm

Ads

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी मध्ये भरगच्च कार्यक्रम- ईतर जिल्ह्यातील पत्रकारांनीही नोंदविला सहभाग

पत्रकार भवन, गृहनिर्माण संस्था,व मराठवाड्यातील सभासद नोंदणीवर महत्वाचे निर्णय

शहिद जवान ,विविध बळी आणि शिक्षणमहर्षी ,माजी राज्यपाल स्व.डॉ. डी.वाय पाटील यांना श्रध्दांजली

परभणी/अकोला :आज छोटी वृत्तपत्रं अडचणीत आणण्याच्या शासनाच्या कडक धोरणाने पत्रकारांची प्रचंड कुचंबना होत आहे.शासनाच्या योजना आणि धोरणांना जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात छोटी वृत्तपत्रेच फक्त अग्रेसर आहेत.या वास्तव परिस्थितीला विसरून जाहिरात यादी, कल्याण योजना आणि अधिस्विकृतीमध्ये खऱ्या पत्रकारांना डावलण्याचे काम शासन करीत आहे.प्रशासनाकडून अवहेलना आणि अपमानास्पद वागणूक आणि दुसरीकडे सामाजिक न्यायाच्या वाटचालीत समाजकंटकांकडून होणारे हल्ले या दृष्टचक्राने पत्रकारिता धोक्यात आलेली आहे.

अशा परिस्थितीत, जात, पात,धर्म आणि सर्वप्रकारचे मतभेद बाजुला ठेऊन पत्रकारांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र यावे.असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी परभणी येथे बोलतांना केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील वसमत रोडवरील सावली विश्रामगृह येथे पत्रकारांच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा शाखेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकार हल्ला प्रकरणी घेतलेल्या आक्रमक भुमिका, पत्रकारिता करताना येणार्‍या अडचणी, नवीन सभासद नोंदणी, पत्रकार भवनाची निर्मिती आणि पत्रकारांसाठी घरकुल यांसारख्या विषयांवर चर्चा करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा व महापुरूषांना वंदन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. देशभर प्रख्यात असलेले उच्च शिक्षणाच्या १७० संस्था आणि विद्यापीठांचे शिल्पकार,३ राज्याचे माजी राज्यपाल कोल्हापूरातील शिक्षणमहर्षी पद्मश्री स्व.डॉ‌‌.डी.वाय‌ पाटील यांना.तसेच देशातील शहीद जवान ,अत्याचारग्रस्त महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी, दिवंगत पत्रकार तसेच नैसर्गिक आपत्ती व अपघातातील बळींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत अनेक उच्च शिक्षण संस्था उभारून युवकांच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका असणाऱ्या डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निधनाबद्दल यावेळी तिव्र शोक व्यक्त करण्यात आला‌‌.

याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख,अभियंता व सामाजिक कार्यकर्ते सय्यद गौसभाई,अधिक्षक अभियंता सुर्यवंशीसाहेब,व अतिथी तथा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे सत्कार आणि गाडगे बाबा सेवा साधनेचे सेवक कावळे मामा यांनाही सन्मानित करण्यात आले.पत्रकारिता करताना येणार्‍या अडचणी, पत्रकारांना संघटित करणे, सभासद वाढ करून पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे पाठपुरावा करणे आदी विषयांवर चर्चा झाली. परभणी जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणे तसेच पत्रकारांना निवासासाठी घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय पदाधिकारी तथा शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य,पुष्पराज भाऊ गावंडे, राष्ट्रीय पदाधिकारी तथा सूत्रसंचालिका जया भारती इंगोले, महाराष्ट्र संघटक भगीरथ बद्दर, अभियंता सय्यद गौस, संपादक मनोहर मोहोड, श्रीकृष्ण माळी, सौ.दिपाली बाहेकर,पत्रकार व समाजसेवक आशिष वानखडे पाटील, मराठवाडा विभागीय संघटन प्रमुख देवानंद वाकळे,वाजीद पठाण,युसूफ पठाण,सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ, संपादिका तारा मेश्राम, उपसंपादक चंद्रकांत रायबोले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल धबाले आदी उपस्थित होते.ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर चंद्रकांतराव देशमुख, हार्दिक सिंग, रणजीत सिंग बावरी, संदीप भीमराव वायवल, युनूस कच्ची, शेख कलीम, राजू कर्डिले, डॉ. मनोहर मोटकर रिसोडकर, उमेश गंगारामजी. अग्रवाल, शाम खिल्लारे, प्रवीण मोरे, शांतीलाल शर्मा, अविनाश जोशी, अकबर अन्सारी, शेख सरफराज, नाझीम सिद्दिकी, कावळे मामा, सय्यद रऊफ अत्तार, सिद्धांत जोंधळे आदी पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद बनकर यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!