Join WhatsApp group

Ads

-

दोन कारवाया, पण प्रेस नोट कुठे? अवैध इंधन प्रकरणात पोलिसांच्या मौनावर सवाल

By Sarkarmzanews

August 19, 2026 1:23 pm

Ads

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अवैध पेट्रोल, डिझेल व इथेनॉलच्या कथित व्यवहारासंदर्भात दोन कारवाया झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई झाल्यानंतरही संबंधित पोलीस ठाण्यांकडून अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नाही तसेच पत्रकारांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

कारवाई झाली तर प्रेस नोट का नाही? कारवाईत किती साठा जप्त झाला, कोणावर गुन्हा दाखल झाला आणि कोणत्या कलमांखाली कारवाई झाली, याची माहिती जनतेपासून का दूर ठेवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘सरकार माझा न्यूज’ने यापूर्वीच महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अवैध इंधन व्यवसायाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

अशा ज्वलनशील पदार्थांचा अनधिकृत साठा हा केवळ कायद्याचा नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे.या पार्श्वभूमीवर आणखी एक सवाल उपस्थित होत आहे—अशा व्यवसायांकडे दुर्लक्ष करण्यामागे कुठला आर्थिक स्वार्थ तर नाही ना?

हा कोणावर थेट आरोप नसून प्रशासनाने स्पष्ट करावा असा प्रश्न आहे.भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?

धोका आधीच निदर्शनास आणून दिला असताना संबंधित अधिकारी नैतिक जबाबदारी स्वीकारणार का?

दोन कारवाया झाल्या, पण प्रेस नोट नाही—नेमके कारण काय? अकोला पोलिसांनी याबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!