Join WhatsApp group

Ads

नॅशनल हायवेवर दाळंबी-अंनभोरा जवळ दुचाकीचा भीषण अपघात; दोन युवक गंभीर जखमी,

By Sarkarmzanews

August 12, 2026 4:25 pm

Ads

विर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची तत्काळ धाव

कुरणखेड- अकोला तालुक्यातील दाळंबी-अंनभोरा दरम्यानची घटना; जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले

दाळंबी-अंनभोरा दरम्यान हायवेवर बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजताच्या सुमारास दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले.

अपघातातील दुचाकीचा क्रमांक एमएच ३० यू ८०३२ असल्याची माहिती आहे.या अपघातात रंणजित वाणखडे (रा. दाळंबी) आणि आनंद मनोहर (रा. जवळा) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पथकाचे सदस्य शुभम कंडाळे यांनी जखमींना तातडीने मदत केली. तसेच पथकाचे प्रमुख योगेश विजयकर आणि शाहबाज शहा हे देखील घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकांची प्रकृती लक्षात घेता त्यांना विलंब न करता ॲम्बुलन्सच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दुचाकीचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी केलेल्या मदतीमुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!