Join WhatsApp group

Ads

घाम गाळा, आरोग्य कमवा! रेड रन मॅरेथॉनमधून युवकांना संदेश

By Sarkarmzanews

August 12, 2026 12:07 pm

Ads

मूर्तिजापूर : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘आरोग्यासाठी धावा, जनजागृतीसाठी धावा, उज्ज्वल भविष्यासाठी धावा’ या संदेशासह आयोजित करण्यात आलेली रेड रन मॅरेथॉन २०२६ उत्साहात संपन्न झाली.

युवकांमध्ये नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

पुरुष गटात ओम वाडेकर यांनी प्रथम, प्रवीण चोपडे यांनी द्वितीय, तर जीत इंगोले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात भूमिका पवार प्रथम, राधिका मोरे द्वितीय, तर नंदिनी राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेते खेळाडू कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

आजच्या मोबाईल आणि बैठ्या जीवनशैलीच्या काळात युवकांनी नियमित धावणे, चालणे व मैदानी खेळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. शारीरिक व्यायामामुळे तंदुरुस्ती राखण्यासोबतच तणाव कमी करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

त्यामुळे अशा उपक्रमातून ‘फिट युवा, सशक्त समाज’ हा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या नियोजनात क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर ताले यांच्यासह क्रीडा शिक्षक वर्गाने महत्त्वाची भूमिका बजावली.यावेळी डॉ. नेमाडे, ऋषिकेश गावंडे (क्रीडा अधिकारी), डॉ. जैनकर, ॲड. अविन अग्रवाल, भूपेंद्र पिंपळे (नगरसेवक), दिनेश श्रीवास, डॉ. विशाल येदवर, चंदन अग्रवाल, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि आयोजक उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला व तालुका क्रीडा अधिकारी, मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!