Join WhatsApp group

Ads

रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण

By Sarkarmzanews

August 12, 2026 11:34 am

Ads

रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषणपाणंद रस्त्यापासून मस्टरपर्यंत ११ मुद्द्यांवर चौकशीची मागणी; निकृष्ट कामांबाबत प्रशासनाकडे तक्रार

अकोला : लाखोंडा बुद्रुक परिसरातील रोजगार हमी योजना आणि विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. पाणंद रस्त्याचे काम, वृक्षारोपण, मजुरांची हजेरी, शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि घंटागाडी खरेदीसह तब्बल ११ मुद्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते गणेश घावट यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.पाणंद रस्त्याच्या कामावर आक्षेपलाखोंडा बुद्रुक ते घुसरवाडी मार्गावरील पाणंद रस्त्याचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याने संबंधित कामाचे देयक थांबवून स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.मस्टरवरील हजेरीची तपासणी करण्याची मागणीरोजगार हमीच्या कामांवरील मस्टरमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप असून, काही ठिकाणी बनावट सह्या करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

ऑनलाइन नोंदीतील मजूर आणि कामाच्या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये तफावत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.याशिवाय, संबंधित नोंदींची १ सप्टेंबर २०२३ पासून तपासणी करून मस्टरवरील स्वाक्षऱ्यांची तज्ज्ञांकडून पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.वृक्षारोपणाच्या कामाचीही चौकशीवृक्षारोपण आणि त्याच्या देखभालीसाठी झालेल्या खर्चाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

प्रत्यक्षात किती झाडे लावण्यात आली, त्यांचे संवर्धन झाले का आणि त्यासाठी किती निधी खर्च झाला, याची कागदपत्रांसह पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामावरही प्रश्नलाखोंडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाचा खर्च यांची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

घंटागाडी खरेदी प्रकरणाची चौकशीग्रामपंचायतीने घंटागाडी खरेदी केल्याची नोंद असतानाही प्रत्यक्षात घंटागाडी उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया, बिल, देयके आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तलावाच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवरगट क्रमांक ११८ मधील गाव तलावाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमिनीची मोजणी आणि इतर विकासकामांबाबतही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.वरिष्ठ पातळीवरून चौकशीची मागणीपाणंद रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी करण्यात आलेली चौकशी समाधानकारक नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नव्याने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, २६ एप्रिल २०२४ रोजी नवरेखेवाडी येथे मजुरांची हजेरी दाखवून देयकाची रक्कम काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.शेतरस्ते आणि रोजगार हमीच्या कामांशी थेट संबंध असल्याने या तक्रारींची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

चौकशी करून कारवाई करु – एपीओ उमेश निखाडे दरम्यान उपोषण स्थळी अकोला पंचायत समितीचे एपीओ उमेश निखाडे यांनी भेट देत आंदोलन करण्याची तक्रारी संदर्भात सविस्तर चर्चा केली.

पंचायत समिती प्रशासनाने या तक्रारीवर चौकशी समिती नियुक्त केली आहे मात्र उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद स्तरावरील चौकशी समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार वरिष्ठांना या संदर्भात माहिती देत चौकशी करण्यात येणार असल्याचे उमेश निखाडे यांनी सांगितले.

Related Article

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांचा एल्गार!

मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा!तालुकास्तरीय चौकशी समिती रद्द करून पाच सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठित करण्याची माजी उपसरपंच अर्चना चोपडे यांची मागणी

हेल्मेटसक्ती अकोलेकरांसाठी ठरतेय डोकेदुखी, शहरात हेल्मेट सक्तीला स्थगिती द्या! युवक काँग्रेसची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

राजेंद्र पातोडेंच्या सत्कारातून पुरोगामी एकजुटीचा हुंकार!

घाम गाळा, आरोग्य कमवा! रेड रन मॅरेथॉनमधून युवकांना संदेश

रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!