Join WhatsApp group

Ads

शासनाच्या पैशातून पोल्ट्री फार्म… अन् रात्री जुगाराचा ‘क्लब’?

By Sarkarmzanews

August 11, 2026 12:53 am

Ads

जैस्वाल पेट्रोल पंपामागील पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीस कथित जुगाराचा खेळ; ‘पाटीलकी’ची चर्चा, अकोट फाईल पोलिसांचे मौन का?

सरकारी निधीचा उद्देश पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्याचा; मात्र त्याच जागेचा कथित गैरवापर होत असल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ

अकोला: शासनाकडून सर्वसामान्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, ग्रामीण भागातील व्यवसायाला चालना मिळावी आणि पोल्ट्री व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने विविध योजनांच्या माध्यमातून पोल्ट्री फार्मसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, ज्या उद्देशासाठी शासनाचा पैसा खर्च करण्यात आला, त्याच पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या वेळी कथित ‘क्लब’ आणि जुगाराचा खेळ सुरू असल्याची चर्चा समोर आल्याने अकोट फाईल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जैस्वाल पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या वेळी काही व्यक्तींची वर्दळ वाढते आणि येथे कथितरित्या जुगाराचा खेळ रंगतो, अशी चर्चा परिसरात आहे. या चर्चेमुळे आता पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोल्ट्री फार्म की रात्रीचा ‘क्लब’?

दिवसा पोल्ट्री फार्म आणि रात्री कथित ‘क्लब’ अशी या ठिकाणाची चर्चा होत असेल, तर हा प्रकार नेमका काय आहे, याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोण येते?

कोणाच्या परवानगीने येते?तेथे नेमके काय सुरू असते?जुगाराचा खेळ होत असल्याची चर्चा खरी आहे का?

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पोलिसांना याची माहिती आहे की नाही?

“व्हा रे व्हा पाटील!”

या संपूर्ण प्रकरणात परिसरात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे ‘पाटलाच’.

ही केवळ स्थानिक चर्चेपुरती बाब आहे की या कथित प्रकारामागे कोणाचे राजकीय अथवा सामाजिक वजन आहे? जर काहीच गैरप्रकार नसेल तर रात्रीच्या वेळी पोलिसांनी अचानक पाहणी करून सत्य जनतेसमोर आणण्यास हरकत काय?

पाटीलची पाटीलकी’ नेमकी किती मोठी?

पोलिसांच्या कारवाईपेक्षा मोठी की काय?

अकोट फाईल पोलिसांचे दुर्लक्ष का?

अवैध जुगार, मटका आणि इतर गैरप्रकारांवर पोलिस प्रशासन कारवाई करत असल्याचे सांगितले जाते. मग जैस्वाल पेट्रोल पंपामागील या पोल्ट्री फार्मबाबत एवढी चर्चा सुरू असताना पोलिस प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई अथवा तपासणी का केली नाही?

पोलिसांना माहिती नाही का?

माहिती असूनही दुर्लक्ष आहे का?

की या ठिकाणाबाबत वेगळीच ‘व्यवस्था’ आहे?

हे प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत.

शासनाचा निधी कुठे गेला?

या प्रकरणाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे पोल्ट्री फार्मसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला शासकीय निधी.

पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी शासनाकडून नेमका किती निधी देण्यात आला?

लाभार्थी कोण?

फार्मची मंजुरी कोणत्या योजनेअंतर्गत झाली?

निधीचा प्रत्यक्ष वापर कसा झाला?

पोल्ट्री फार्म सध्या कार्यरत आहे का?

तेथे पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे का?

की जागेचा अन्य कारणासाठी वापर केला जात आहे?

या सर्व बाबींची शासकीय स्तरावर चौकशी होणे आवश्यक आहे.

जर शासनाच्या निधीतून उभारलेल्या मालमत्तेचा वापर मंजूर उद्देशाव्यतिरिक्त होत असेल, तर संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

रात्रीच्या ‘खेळा’चा तपास कधी?

परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही व्यक्तींची ये-जा वाढते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता अचानक रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.जर जुगार सुरू असल्याचे आढळले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी.

जर आरोप चुकीचे असतील, तर पोलिसांच्या तपासणीतून तेही स्पष्ट होईल.

म्हणजेच सत्य समोर आणण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे.

पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह

अकोट फाईल परिसरात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त किती असते? संबंधित बीट मार्शल किंवा कर्मचारी या परिसरात नियमित भेट देतात का?

संशयास्पद गर्दी अथवा हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत का?या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

एखाद्या ठिकाणी रात्री वारंवार संशयास्पद हालचाली होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असेल, तर पोलिसांनी त्याची पडताळणी करणे हे त्यांचे कर्तव्य नाही का?

‘सरकार माझा न्यूज’चा थेट सवाल

शासनाने पैसा दिला पोल्ट्री फार्मसाठी…मग रात्री कथित ‘क्लब’ कसा?

‘पाटीलकी’च्या चर्चेमागचे सत्य काय?

अकोट फाईल पोलिस प्रशासन कारवाई करणार का?

शासकीय निधीचा वापर नियमानुसार झाला का?

जैस्वाल पेट्रोल पंपामागील पोल्ट्री फार्मची रात्री अचानक तपासणी होणार का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस प्रशासन, संबंधित शासकीय विभाग आणि संबंधित लाभार्थी यांनी जनतेसमोर देणे आवश्यक आहे.

रात्रीचा हा कथित ‘खेळ’ नेमका कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे?

पोलिसांच्या कारवाईनंतरच या चर्चेतील सत्य बाहेर येणार आहे.

“व्हा रे व्हा पाटील… आता पोलिसांची ‘पाळी’!”

photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!