Join WhatsApp group

Ads

निंबी मालोकार येथे गोळीबार; ३९ वर्षीय अमोल मालोकार यांची हत्या सहा राऊंड फायरिंगने गावात खळबळ;

By Sarkar Maza

August 10, 2026 10:58 am

Ads

अकोला : बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी अमोल मालोकार (३९) यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अमोल मालोकार यांच्यावर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे सहा राऊंड गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळीघटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

आरोपींचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बाळापूर पोलिस, जुने शहर पोलिस आणि पातूर पोलिसांची स्वतंत्र पथके कामाला लागली आहेत. संशयितांच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेत विविध भागांत शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

घटनास्थळावरून पुरावे संकलितगोळीबाराच्या ठिकाणी पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. घटनेशी संबंधित भौतिक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून, परिसरातील नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेतली जात आहे.

हल्लेखोर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.शेतरस्त्याच्या वादाची शक्यतादरम्यान, अमोल मालोकार यांचे बंधू उमेश मालोकार यांनी शेतरस्त्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून शेतरस्त्याच्या वादासह पूर्ववैमनस्य आणि अन्य संभाव्य कारणांचा तपास केला जात आहे.या प्रकरणात बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची पथके युद्धपातळीवर काम करीत आहेत.

“शेतरस्त्याच्या वादातून हल्ला झाल्याचे मृताच्या भावाचे म्हणणे आहे. सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.”—

अशी माहिती गजानन पडघन, उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर

बातमी – श्रीकांत पाचकवडे

फोटो – AI GENRATED

Related Article

निंबी मालोकार येथे गोळीबार; ३९ वर्षीय अमोल मालोकार यांची हत्या सहा राऊंड फायरिंगने गावात खळबळ;

‘१ गोळी हवी तर एकच मिळणार!’ मेडिकल स्टोअर्सना तुकाराम मुंढेंचा दणका

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश? ‘त्या’ कोहिनूर हिऱ्याच्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने बदलणार शहराचे राजकीय समीकरण!

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!