Join WhatsApp group

Ads

‘१ गोळी हवी तर एकच मिळणार!’ मेडिकल स्टोअर्सना तुकाराम मुंढेंचा दणका

By Sarkar Maza

August 10, 2026 10:07 am

Ads

गरजेपेक्षा जास्त औषधे घेण्याची सक्ती केल्यास परवाना रद्द होणार.

ग्राहकांना तक्रारीचे आवाहन – श्रीकांत पाचकवडे

अकोला : ग्राहकाला जेवढ्या औषधांची गरज आहे, तेवढीच औषधे देणे अपेक्षित असताना पूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता चाप बसणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर चालक आणि फार्मासिस्टना स्पष्ट इशारा दिला आहे.

एखाद्या औषधाच्या स्ट्रिपमध्ये १० गोळ्या असतील, मात्र ग्राहकाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ ५ गोळ्यांची आवश्यकता असेल, तर त्याला पूर्ण स्ट्रिप खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही. ग्राहकाला आवश्यक तेवढ्याच गोळ्या देणे अपेक्षित आहे.सक्ती केल्यास कठोर कारवाईग्राहकांना गरजेपेक्षा जास्त औषधे खरेदी करण्यास भाग पाडणे किंवा पूर्ण स्ट्रिप घेण्याची सक्ती करणे संबंधित मेडिकल स्टोअरला महागात पडू शकते.

अशा प्रकारची सक्ती झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित मेडिकल स्टोअरवर कारवाई करण्याबरोबरच औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.ग्राहकांनी गप्प बसू नये!

मेडिकल स्टोअरमध्ये औषधांची अनावश्यक मात्रा खरेदी करण्याची सक्ती होत असल्यास ग्राहकांनी त्याविरोधात तक्रार करावी. प्रशासनाने यासाठी 1800-222-365 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच complaints.mahafda.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे.

गरज नसताना औषधांचा अतिरिक्त साठा ग्राहकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला आळा घालण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे मेडिकल स्टोअर्सच्या मनमानीवर लगाम बसण्याची शक्यता आहे.ग्राहकांचा थेट अधिकारडॉक्टरांनी सांगितलेल्या आवश्यक प्रमाणातच औषधे घेण्याचा हक्क.पूर्ण स्ट्रिप घेण्याची सक्ती करता येणार नाही.

सक्ती झाल्यास प्रशासनाकडे तक्रार करता येणार.नियमभंग सिद्ध झाल्यास मेडिकल स्टोअरवर कठोर कारवाई होऊ शकते.“जेवढी गरज, तेवढेच औषध — ग्राहकांच्या हक्कांवर कुठलीही तडजोड नाही!”

Related Article

निंबी मालोकार येथे गोळीबार; ३९ वर्षीय अमोल मालोकार यांची हत्या सहा राऊंड फायरिंगने गावात खळबळ;

‘१ गोळी हवी तर एकच मिळणार!’ मेडिकल स्टोअर्सना तुकाराम मुंढेंचा दणका

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश? ‘त्या’ कोहिनूर हिऱ्याच्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने बदलणार शहराचे राजकीय समीकरण!

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!