Join WhatsApp group

Ads

----

‘हार-तुरे’ की ‘डील’? बाहेरील आमदारांच्या दौऱ्यामागे राजकीय खेळी की काळ्या साम्राज्याची धडधड?

By Sarkar Maza

August 7, 2026 1:04 pm

Ads

मुर्तिजापूरमध्ये एका बाहेरील आमदारांचे जंगी स्वागत झाले… हार, तुरे, घोषणाबाजी आणि निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती. वरकरणी हा राजकीय सदिच्छा दौरा वाटत असला, तरी शहरातील राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.

प्रश्न असा आहे की, हा दौरा नेमका कोणासाठी होता—जनतेसाठी, की काही निवडक हितसंबंध जपण्यासाठी?

सूत्रांकडून अशी चर्चा आहे की, नुकतेच रुजू झालेल्या एका प्रशासनिक अधिकाऱ्याशी संबंधित आमदारांचा पूर्वपरिचय असल्याने हा दौरा आयोजित करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर काही स्थानिक नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

यामुळे शहरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुर्तिजापूरमध्ये गेल्या काही काळापासून विविध बेकायदेशीर धंदे, काळाबाजार, दलाली आ इणि प्रभावशाली हितसंबंधांबाबत सातत्याने चर्चा होत असते. अशा वातावरणात अचानक बाहेरील आमदारांचे आगमन आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे नागरिकांच्या मनात संशयाचे ढग दाटले आहेत.

राजकीय वर्तुळात असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासन अधिक कडक होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही हितसंबंधी गट सक्रिय झाले आहेत का? नव्या अधिकाऱ्यांपर्यंत ‘राजकीय ओळख’ पोहोचवण्याचा प्रयत्न झाला का?

या सर्व चर्चांमुळे शहरात एकच कुजबुज ऐकायला मिळत आहे—

हा केवळ स्वागत सोहळा होता, की भविष्यातील कारवायांपूर्वी प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न?

या प्रकरणातील सर्व दावे आणि चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित आमदार, आयोजक आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांची भूमिका मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. सरकार माझा न्यूज या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!