Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरात ‘अण्णाभाऊ साठे चौक’वरून नवा वाद! ठराव एक, फलक दुसरीकडे; आंदोलनाचा इशारा

By Sarkar Maza

August 6, 2026 12:24 am

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषदेत मंजूर झालेल्या ठराव क्रमांक १३ वरून शहरात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे गटनेते तथा नगरसेवक गजानन मुकुटराव नाकट यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा चौक ज्या ठिकाणी मंजूर झाला, त्या जागेवर फलक न लावता दुसऱ्याच ठिकाणी फलक उभारण्यात आल्याचा आरोप केला आहे.

१५ जून २०२६ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या बैठकीत श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयालगतच्या चौकाला डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला होता.

मात्र, ठरावातील जागेऐवजी अन्य ठिकाणी नामफलक लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात प्रशासनाने मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून नामफलक मूळ मंजूर जागेवर हलवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे नगरपरिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता मुख्याधिकारी या निवेदनावर काय निर्णय घेतात आणि ठरावाची अंमलबजावणी होते का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

आज मातंग समाजाच्या वतीने शेकडोच्या संख्येने या विषयावर संबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!