Join WhatsApp group

Ads

खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ लाल पाट्यांवर कारवाईचे निर्देश; राज्यभरातील पोलीस आयुक्त व अधीक्षकांना पत्र

By Sarkar Maza

August 5, 2026 5:23 pm

Ads

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या ‘पोलीस’ नावाच्या लाल पाट्यांवर निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांनी 31 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.

पत्रानुसार, अर्जदार सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत, अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी किंवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ लिहून वाहनांचा वापर करीत असल्याचे नमूद केले आहे.

अशा वाहनांची तपासणी टाळली जाते आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचा गैरवापर किंवा अवैध वाहतुकीसाठी उपयोग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर, खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी लावणे किंवा नाव प्रदर्शित करणे आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 133(6) तसेच मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने संबंधित तक्रार पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सर्व संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे पाठवून, नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.या पत्रामुळे राज्यभरातील खासगी वाहनांवर लावल्या जाणाऱ्या ‘पोलीस’ लाल पाट्यांबाबत प्रशासनाची भूमिका अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!