Join WhatsApp group

Ads

धक्कादायक राजकीय ट्विस्ट! भाजपचे कट्टर विरोधक शेखर येदवर थेट भाजपमध्ये; मुर्तिजापूरच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?

By Sarkar Maza

August 4, 2026 12:37 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी :

मुर्तिजापूर शहरातील राजकीय वर्तुळात आज झालेल्या पक्षप्रवेशाने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या लक्कडगंज येथील जनसंपर्क कार्यालयात शेखर येदवर, दर्शन येदवर, संग्राम येदवर, शुभम येदवर, जीवन येदवर, श्रवण येदवर, भावेश येदवर आणि विनोद येरडावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशात सर्वाधिक चर्चा शेखर येदवर यांच्या प्रवेशाची होत आहे. कारण नगर परिषद निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचा अचानक झालेला भाजप प्रवेश हा मुर्तिजापूरच्या राजकारणातील महत्त्वाचा राजकीय ट्विस्ट मानला जात आहे.

या घडामोडीनंतर शहरात विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय समीकरणे आकार घेत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. या चर्चांना मात्र अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

दरम्यान, शेखर येदवर यांच्या पक्षप्रवेशानंतर आणखी एका चर्चेने जोर धरला आहे. येणाऱ्या काळात त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भात भारतीय जनता पक्ष किंवा संबंधित स्तरावरून कोणतीही अधिकृत घोषणा अथवा पुष्टी करण्यात आलेली नाही.

त्यामुळे या चर्चांकडे सध्या केवळ राजकीय तर्क-वितर्क म्हणूनच पाहिले जात आहे.यावेळी आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता शेखर येदवर यांच्या या राजकीय निर्णयामागील नेमकी भूमिका काय, तसेच पुढील काळात मुर्तिजापूरच्या राजकारणात आणखी कोणते राजकीय बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण राजकीय गणिताचा मागे प्रमुख सूत्रधार नगरसेवक राम जोशी यांचा नाव चर्चेत

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!