Join WhatsApp group

Ads

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

By Sarkar Maza

August 3, 2026 9:33 pm

Ads

हैदराबाद, कोईम्बतूर, बेंगळुरू, मुंबई, नांदेड व हिंगोली येथे पथकांची शोधमोहीम; तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद.

बाळापूर येथील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार आरोपी पोलीस शिपाई पवन उध्वराव वडगावे याला अकोला पोलिसांनी अखेर नांदेड जिल्ह्यातील मारताडा (ता. नायगाव) येथून अटक केली.

सुमारे २० दिवस सातत्याने विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ६४, १०८ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी पवन वडगावे हा त्या वेळी बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. तो पीडित मुलीच्या कुटुंबाच्या घरात भाड्याने राहत होता. मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून कथित लैंगिक अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने पीडितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी आपल्या मूळगावी नांदेड जिल्ह्यात गेल्यानंतर फरार झाला होता. आरोपी स्वतः पोलीस खात्यातील कर्मचारी असल्याने तपासातील बारकावे माहिती असल्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बाळापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांना आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि बाळापूर पोलीस ठाण्याची दोन अशी एकूण पाच शोध पथके तयार करण्यात आली. या पथकांनी हैदराबाद, कोईम्बतूर, बेंगळुरू, मुंबई, नांदेड आणि हिंगोली येथे आरोपीच्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि संभाव्य ठिकाणांची कसून तपासणी केली.

अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पवन उध्वराव वडगावे (रा. नरसी, जि. नांदेड) याला मारताडा, ता. नायगाव, जि. नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

Related Article

सामान्य जनतेचा विश्वास जिंकत जिंकत… ‘सरकार माझा न्यूज’ने गाठला १ लाख सक्रिय वाचकांचा मैलाचा दगड

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

मुर्तिजापूरमध्ये विकासापेक्षा गटबाजीला अधिक महत्त्व? नागरिकांचा सवाल

बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्याच घरात चोरी; एलसीबीने काही तासांत आरोपीला जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक गजानन तायडे यांच्या सामाजिक विचारांचा वटवृक्ष; ‘तीक्ष्णगत’ संस्थेतून गरजू बालकांना अन्नधान्याची मदत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!