Join WhatsApp group

Ads

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

By Sarkar Maza

August 3, 2026 12:33 pm

Ads

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह समाजाच्या न्याय, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने ‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ’ अकोला जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

रविवारी (२ ऑगस्ट २०२६) जिल्हाध्यक्ष श्री. नारायण मा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत सविस्तर चर्चेनंतर नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, युवकांना शिक्षण व रोजगाराबाबत मार्गदर्शन करणे, तसेच समाजात एकजूट आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

जिल्हाध्यक्ष: श्री. नारायण मा. चव्हाण

जिल्हा कार्यकारी अध्यक्ष: प्रा. डी. एस. राठोड

जिल्हा उपाध्यक्ष: श्री. सुनील महादेवराव पवार, प्रा. बी. एस. पवार

जिल्हा सचिव: श्री. सतीश जाधव

जिल्हा सहसचिव: श्री. सतीश राठोड, श्री. धीरज आडे

जिल्हा कोषाध्यक्ष: प्रा. महेश राठोड

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख: श्री. कुंदन जाधव

जिल्हा संघटक: श्री. भीमराव राठोड, श्री. कुणाल जाधव, श्री. महादेव राठोड, श्री. नरेंद्र आडे

जिल्हा कार्यकारिणी सदस्य: श्री. बंडू राठोड, श्री. पंडित राठोड, श्री. प्रवीण राठोड

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी समाजहिताला प्राधान्य देत बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या निवडीबद्दल समाजातील विविध संघटना, मान्यवर आणि कार्यकर्त्यांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Article

सामान्य जनतेचा विश्वास जिंकत जिंकत… ‘सरकार माझा न्यूज’ने गाठला १ लाख सक्रिय वाचकांचा मैलाचा दगड

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

मुर्तिजापूरमध्ये विकासापेक्षा गटबाजीला अधिक महत्त्व? नागरिकांचा सवाल

बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्याच घरात चोरी; एलसीबीने काही तासांत आरोपीला जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक गजानन तायडे यांच्या सामाजिक विचारांचा वटवृक्ष; ‘तीक्ष्णगत’ संस्थेतून गरजू बालकांना अन्नधान्याची मदत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!