Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; ११,८४६ प्रकरणांवर कार्यवाही, ८२० प्रमाणपत्रांचे वितरण

By Sarkar Maza

August 2, 2026 9:48 am

Ads

मुर्तिजापूर, दि. १ ऑगस्ट : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडले. महालक्ष्मी मंगल कार्यालय, कोकणवाडी येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या शिबिराला आमदार हरिष पिंपळे आणि मुर्तिजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हर्षल साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी तहसीलदार शिल्पा बोबडे, तहसीलदार रविंद्र कापशीकर, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, कृषी, महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिबिरात २९ विविध शासकीय सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, भूमी अभिलेख, कृषी, पंचायत, नगरपालिका, सेतू केंद्र, आधार सेवा केंद्र, बांधकाम कामगार विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग आदींच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. ई-फेरफार, ई-मोजणी, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले व प्रमाणपत्रे मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शिबिरादरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थसहाय्याचे वितरण, संजय गांधी योजनेंतर्गत लाभांचे वाटप, कूळ जमिनींच्या वर्ग-२ ते वर्ग-१ प्रकरणांचा निपटारा, फेरफार प्रकरणे निकाली काढणे अशा विविध कामांना गती देण्यात आली.

आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते एकूण ८२० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.महाराजस्व अभियानाच्या कालावधीत महसूल विभागाने ११ हजार ८४६ प्रकरणांवर कार्यवाही करून प्रशासनाची कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता अधोरेखित केली.

समाधान शिबिराला सुमारे १,५०० नागरिकांनी उपस्थिती लावली असून १०७ तक्रारी व निवेदने प्राप्त झाली आहेत. या सर्व तक्रारींचे नियमानुसार तातडीने परीक्षण करून वेळेत निराकरण केले जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम केले.

नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी ठरल्याचे प्रशासनाने नमूद केले.

Related Article

मुर्तिजापूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; ११,८४६ प्रकरणांवर कार्यवाही, ८२० प्रमाणपत्रांचे वितरण

“अवैध धंद्यांवरून राजकीय रस्सीखेच? चर्चांनी तापले मुर्तिजापूर!”

“महापुरुषांचा सन्मान की राजकीय अहंकार? अण्णा भाऊ साठे चौकावरील वादाने उघडे पाडले समाज फोडण्याचे राजकारण!”

सण, संस्कृती आणि गंजी-पत्त्यांचा खेळ; प्रशासनाची भूमिका काय?

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा जुगार अड्ड्यांना उधाण? सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेच्या चर्चेने खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी

माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!