Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

By Sarkar Maza

July 24, 2026 3:10 pm

Ads

वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनावर पुकारण्यात आलेल्या काल महाराष्ट्र बंदला मुर्तिजापूर शहरात व्यापारी, लहान व्यावसायिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

सुरुवातीला मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत असल्याचे चित्र होते.मात्र, मोर्चा पुढे जात असताना काही समाजकंटकांनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न शहरात झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने आंदोलनाच्या शांततेला गालबोट लागले. त्यामुळे जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला.

दरम्यान, व्यापारी संघटना आणि मोर्चा आयोजकांनी संयमाची भूमिका घेत आंदोलकांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून, शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध सु-मोटो (Suo Motu) गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकृत स्तरावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर जिल्हा पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे शांततेचा भंग करणाऱ्यांवर लवकरच कायद्याचा चाबूक चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Article

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? एक महिना उलटला, निंभा अतिक्रमण प्रकरणात कारवाई शून्य!

मुर्तिजापूर बंदचा स्फोटक पर्दाफाश? गटबाजी? तोडफोड? आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीमागचे धक्कादायक चित्र

धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो– मुर्तीजापुरात गुंजला तरुणाईचा आवाज. विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले शहर

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात सदार दाम्पत्याची याचिका फेटाळली

मास्टर डी. व्ही. व्ही. प्रसाद यांच्या उपस्थितीत तायक्वांडो बेल्ट परीक्षा पार पडली

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!