Join WhatsApp group

Ads

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

By Sarkar Maza

July 17, 2026 4:40 pm

Ads

कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवरील नॅशनल ढाब्यावर पेट्रोल व डिझेलची कथितरीत्या अवैध चोरी करून उतरविण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

ढाब्याच्या परिसरात मोठमोठे टिनशेड उभारून त्यामागे भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी पेट्रोल व डिझेलच्या टँकरमधून इंधन खाली करण्यात येत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कथितरीत्या इंधनाचा साठा केला जात असल्याचीही चर्चा असून, हा साठा नॅशनल ढाब्याजवळ तसेच भारत गॅस गोडाऊनच्या शेजारी तयार करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

अशा संवेदनशील ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्यास एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.अत्यंत ज्वलनशील असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे अशा प्रकारे कथितरीत्या हाताळणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून मोठ्या दुर्घटनेलाही निमंत्रण देणारे ठरू शकते.

ढाब्यावर येणारे ग्राहक, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एखादी ठिणगी किंवा निष्काळजीपणा मोठ्या स्फोटास कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या कथित प्रकारामागे अकोला येथील आसिफ व जफर हे मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या संपूर्ण प्रकाराची माहिती कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना आहे की नाही, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच काही अधिकारी वर्गाच्या संरक्षणामुळे हा कथित प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

जर या ठिकाणी प्रत्यक्षात इंधनाची अवैध चोरी, साठवणूक किंवा व्यवहार सुरू असतील, तर संबंधित विभाग, अग्निशमन विभाग, पेट्रोलियम कंपन्या आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे व दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

(टीप : वरील वृत्तातील काही बाबी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेल्या आरोप व चर्चांवर आधारित आहेत. संबंधित व्यक्ती व प्रशासनाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Related Article

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!