Join WhatsApp group

Ads

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

By Sarkar Maza

July 16, 2026 12:41 pm

Ads

मुर्तिजापूर, दि. १६ जुलै : मुर्तिजापूर शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून जप्त केलेला ₹72,300 किंमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल मूळ फिर्यादीच्या ताब्यात परत केला आहे.मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३६१/२०२६ अंतर्गत कलम ३०५, ३३१(३) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील फिर्यादी महेंद्र अनिल आगळेकर (वय ३५, रा. सरोदे प्लॉट, जुनी वस्ती, मुर्तिजापूर) यांनी तक्रार दिली होती.या गुन्ह्यात प्रदीप उत्तमराव इंगळे (रा. मलाईपुरा, जुनी वस्ती, मुर्तिजापूर) व विजय मधुकर रोडे (रा. धोत्रा शिंदे, ता. मुर्तिजापूर) यांना आरोपी करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

जप्त मुद्देमालामध्ये ३० सोन्याचे मणी, सोन्याचे लॉकेट, जिवती, कानातील दागिने, नथ, बेसर, चांदीचे पायल व चांदीचे लॉकेट अशा विविध दागिन्यांचा समावेश असून त्यांची एकूण अंदाजे किंमत ₹72,300 इतकी आहे.न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा संपूर्ण मुद्देमाल फिर्यादी महेंद्र आगळेकर यांना कायदेशीररित्या परत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वात, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उज्वला भाले व त्यांच्या पथकाने केली.

Related Article

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

मुर्तिजापूरच्या FIR मधील ‘RP’ कोण? शहरात एकच खळबळ; अज्ञात पांढरपोषाचा शोध लागणार कधी?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!