Join WhatsApp group

Ads

₹६ हजारांची लाच घेताना पंचायत समिती तेल्हाराचे सहायक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By Sarkar Maza

July 14, 2026 8:49 pm

Ads

अकोला |

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अकोला पथकाने सोमवारी (१४ जुलै) मोठी कारवाई करत पंचायत समिती तेल्हारा येथील सहायक कार्यक्रम अधिकारी संदीप विजय झाडोकार यांना ₹६,००० ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणात तांत्रिक सहायक शिरीष सदापुरे यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठादार असून सन २०२३-२४ मध्ये ग्रामपंचायत पिवंदळ खुर्द (ता. तेल्हारा) येथे मंजूर झालेल्या आर.सी. मातोश्री पांदण रस्त्याच्या कामासाठी त्यांनी साहित्य पुरवले होते. या कामाचे ₹१४.७८ लाखांचे बिल ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले होते.

हे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला ₹७,००० लाचेची मागणी केली. त्यानंतर देयक मंजूर झाल्यानंतर १४ लाखांच्या बिलावर एक टक्का प्रमाणे प्रत्येकी ₹१४,००० लाच देण्याचीही मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी ८ जुलै रोजी करण्यात आली. त्यामध्ये सहायक कार्यक्रम अधिकारी संदीप झाडोकार यांनी ₹६,००० लाचेची मागणी केल्याचे, तर तांत्रिक सहायक शिरीष सदापुरे यांनीही लाचेच्या व्यवहारास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने १४ जुलै रोजी सापळा रचला. तेल्हारा येथील आर.के. बार गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये तक्रारदाराकडून ₹६,००० ची लाच स्वीकारताना संदीप झाडोकार यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर व एसीबी अकोला पथकाने केली.

फोटो – AI GENRATED

Related Article

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव

शिवणी विमानतळासमोरील अर्धवट उड्डाणपुला विरोधात नागरिकांचा इशारा; ३० जुलैला रास्ता रोको आंदोलन

बोगस बियाणे, खत कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा; आमदार हरिष पिंपळे आक्रमक नियम धाब्यावर ठेवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी;

मुर्तिजापूरात बंदी असलेली स्वीट सुपारी खुलेआम विक्रीला?; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन कारवाई करणार का?

विधानसभेत घुमला शेतकऱ्यांचा आवाज; हरिष पिंपळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

पक्षांतराच्या अफवा निराधार; विकासकामांसाठीच आमदारांची भेट – वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे स्पष्टीकरण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!