Join WhatsApp group

Ads

--

मुर्तिजापूरात बंदी असलेली स्वीट सुपारी खुलेआम विक्रीला?; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन कारवाई करणार का?

By Sarkar Maza

July 13, 2026 10:45 am

Ads

मुर्तिजापूर शहरात लहान मुलांना आकर्षित करणारी स्वीट सुपारीची पाकिटे खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र समोर येत असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शाळांच्या परिसरात, पानटपऱ्या तसेच किराणा दुकानांमध्ये अवघ्या ₹१ मध्ये मिळणारी स्वीट सुपारी सहज उपलब्ध होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यात सुपारीजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत विविध नियम लागू असताना, त्यांची अंमलबजावणी मुर्तिजापूरात होत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे आकर्षक पॅकिंगमुळे लहान मुले या पदार्थांकडे सहज आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुपारीचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

त्यामुळे अशा उत्पादनांची विक्री आणि त्यावरील नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी अशा उत्पादनांची सर्रास विक्री होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA), अन्न सुरक्षा विभाग, पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांनी संयुक्त तपासणी करून नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

प्रश्न अनुत्तरितच…

शहरात लहान मुलांना सहज मिळणारी स्वीट सुपारी कोणाच्या आशीर्वादाने विकली जाते?

संबंधित विभाग नियमित तपासणी करतो का?

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?

लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालणारे कोण?

आता या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभाग कारवाई करणार की केवळ कागदोपत्रीच नियम राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Article

विधानसभेत घुमला शेतकऱ्यांचा आवाज; हरिष पिंपळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

पक्षांतराच्या अफवा निराधार; विकासकामांसाठीच आमदारांची भेट – वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे स्पष्टीकरण

मुर्तिजापूर पोलिसांचा धडाका; मटका व्यवसायावर कारवाई, बेपत्ता दोन बालकांचा शोध तर दोन गोवंशाची सुटका

रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र चिखलमय पाणंद वाटा

दानापूर ग्रामसचिवालयाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!