Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर पोलिसांचा धडाका; मटका व्यवसायावर कारवाई, बेपत्ता दोन बालकांचा शोध तर दोन गोवंशाची सुटका

By Sarkar Maza

July 10, 2026 7:34 pm

Ads

मुर्तिजापूर शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ आणि ‘ऑपरेशन उड्डाण’ अंतर्गत विविध ठिकाणी धडक कारवाया करत अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मोहीम राबविली.

या कारवाईत मटका-जुगार प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, गोवंशाची निर्दयी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून वाहनासह सुमारे ₹३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

पहिल्या कारवाईत पोलिसांनी अजय हार्डवेअरसमोर छापा टाकून अजय मोहन अग्रवाल (वय ५२, रा. टाकवाडी, मुर्तिजापूर) याच्यासह व्हॉट्सअॅपद्वारे मटका चालविणाऱ्या अन्य संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, वरळीच्या चिठ्ठ्या, मोबाईल व अन्य साहित्य असा ₹६,९३० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत लहरीया प्लॉट परिसरातील रमेश पिराजी कोडवले यांच्या घरी छापा टाकून रोख रक्कम, वरळीच्या चिठ्ठ्या, मोबाईल, राऊटर आदींसह ₹११,८६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातही अनेक व्हॉट्सअॅप क्रमांकधारकांचा सहभाग तपासात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय, दर्यापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान टाटा एस (एमएच-०४ जीसी-९३६७) वाहनातून दोन गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी निर्दयीपणे बांधून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले.

वाजीद खान अन्सार खान (रा. पठाणपुरा, मुर्तिजापूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत दोन गायी व टाटा एस वाहनासह ₹३,४५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जनावरांना पुढंलिक महाराज गोशाळेत सुरक्षित दाखल करण्यात आले.

दरम्यान, ‘ऑपरेशन उड्डाण’ अंतर्गत २ जुलै रोजी बेपत्ता झालेले आकाश गणेश नंदा (वय १३) व अक्षय अजय गज्जलवार (वय १३) हे दोन्ही मित्र अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे सुखरूप आढळून आले. पोलिसांनी त्यांना पालकांच्या ताब्यात दिले असून, या शोध मोहिमेत पोलीस मित्र संघटनेचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

सर्व कारवाया पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल्या. पुढील तपास सुरू आहे.

Related Article

रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र चिखलमय पाणंद वाटा

दानापूर ग्रामसचिवालयाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

ऑपरेशन प्रहारचा धडाका; २४ तासांत चार मोठ्या कारवाया, तलवारबाज, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, गुटखा साठेबाज आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांचा घाव

स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना संगीतमय आदरांजली

अकोला MIDC मधील मसाला उद्योगांवर धाड टाकणार का?लाल मिरची, धणे व हळद पावडरमध्ये भेसळीच्या चर्चांनी ग्राहकांमध्ये चिंता.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!