Join WhatsApp group

Ads

दानापूर ग्रामसचिवालयाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

By Sarkar Maza

July 8, 2026 6:29 pm

Ads

अकोला, दि. ८ जुलै : तेल्हारा तालुक्यातील दानापूर ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, मंजूर अंदाजपत्रक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) तांत्रिक निकषांचे उल्लंघन करणे, आवश्यक वॉटर क्युरिंग न करणे तसेच अभियंते व ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभावी देखरेख न ठेवल्यामुळे शासन निधीच्या संभाव्य गैरवापराचा गंभीर संशय निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत दानापूरचे प्रशासकीय सदस्य गोपाल माधवराव विखे यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, २ एप्रिल २०२६ रोजी काढलेल्या छायाचित्रांमध्ये इमारतीला पडलेल्या भेगा, शौचालय व सेप्टीक टँकची खराब अवस्था स्पष्ट दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला असून, इमारतीच्या मागील व बाजूच्या भागावर प्लास्टर करून मूळ दोष झाकण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व बांधकाम, प्लास्टर, रंगकाम, मोजमाप पुस्तिका (एम.बी.) नोंदी, तांत्रिक मंजुरी आणि देयके तात्काळ स्थगित करावीत, तसेच शासनमान्य प्रयोगशाळेतून बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीत आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार किंवा शासन निधीचा अपहार सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार, अभियंते, ग्रामपंचायत प्रशासन व जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि निकृष्ट बांधकाम संबंधित ठेकेदाराकडून स्वतःच्या खर्चाने नव्याने करून घ्यावे, अशीही मागणी गोपाल विखे यांनी केली आहे.

Related Article

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

ऑपरेशन प्रहारचा धडाका; २४ तासांत चार मोठ्या कारवाया, तलवारबाज, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, गुटखा साठेबाज आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांचा घाव

स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना संगीतमय आदरांजली

अकोला MIDC मधील मसाला उद्योगांवर धाड टाकणार का?लाल मिरची, धणे व हळद पावडरमध्ये भेसळीच्या चर्चांनी ग्राहकांमध्ये चिंता.

मोरगाव भाकरे येथील RO प्लांटचे कुलूप तोडल्याचा आरोप; दलित ठेकेदाराने न्यायाची मागणी

शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत एनसीआर दाखल

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!