Join WhatsApp group

Ads

--

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

By Sarkar Maza

July 7, 2026 4:48 pm

Ads

मुंबई : राज्यात उशिरा झालेल्या पावसामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचा गंभीर मुद्दा आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी त्यांनी सभागृहात केली.

आमदार पिंपळे म्हणाले की, अनेक भागांमध्ये तूर, सोयाबीन आणि कपाशीची बियाणे पेरल्यानंतर अपेक्षित प्रमाणात उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुबार पेरणीची वेळ आली आहे. यामुळे बळीराजा गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.

यावेळी त्यांनी तूर पिकासाठी अंकुर सीड (चारू) तसेच कपाशीसाठी न्यूझीलंड सीड आणि मंगलम सीड या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद केले. तसेच बूस्टर, इंगो, रवी, ओसवाल, केडियम, ग्रीन गोल्ड, एशियन अॅग्रो, आदित्य, बिंगर आणि ईगल या सोयाबीन बियाण्यांबाबतही तक्रारी समोर आल्याचा उल्लेख करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

आमदार पिंपळे यांनी सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या:

बियाणे न उगवलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.

दोषी आढळणाऱ्या बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे कंपन्या आणि शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी.

निकृष्ट किंवा बोगस बियाण्यांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणून दोषींना कायदेशीर शिक्षा करावी.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी अधिक मोठ्या संकटात सापडतील, असा इशाराही दिला.

Related Article

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

ऑपरेशन प्रहारचा धडाका; २४ तासांत चार मोठ्या कारवाया, तलवारबाज, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, गुटखा साठेबाज आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांचा घाव

स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना संगीतमय आदरांजली

अकोला MIDC मधील मसाला उद्योगांवर धाड टाकणार का?लाल मिरची, धणे व हळद पावडरमध्ये भेसळीच्या चर्चांनी ग्राहकांमध्ये चिंता.

मोरगाव भाकरे येथील RO प्लांटचे कुलूप तोडल्याचा आरोप; दलित ठेकेदाराने न्यायाची मागणी

शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत एनसीआर दाखल

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!