Join WhatsApp group

Ads

-

शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत एनसीआर दाखल

By Sarkar Maza

July 4, 2026 9:23 am

Ads

मूर्तिजापूर, ता. ४ जुलै :मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने मुद्दाम नष्ट करून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात एनसीआर (अदखलपात्र गुन्हा) क्रमांक 0479/2026 दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार उत्तमराव उदयभानजी मालखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व त्यांची पत्नी अमरावती येथे असताना त्यांच्या शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने माडून टाकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने शेतात गेले असता पराटीचे पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.

घटनास्थळी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, गजानन प्रल्हाद हरसुले व अनिल प्रल्हाद हरसुले यांच्यासह अन्य एका व्यक्तीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने पीक माडल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत अंदाजे १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम 324(2) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची (NCR) नोंद केली असून, तक्रारदारांना पुढील दाद मागण्यासाठी संबंधित न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टीप : सदर प्रकरणात एनसीआर नोंदविण्यात आली असून, तक्रारीतील आरोपांची न्यायालयीन किंवा पोलीस तपासातून पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.

Related Article

शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत एनसीआर दाखल

शाळांमध्ये एका बुक स्टोअरची सक्ती थांबवा; प्रत्येक शाळेत किमान पाच बुक स्टोअर्सची यादी लावण्याची मागणी

पॉर्नचा विळखा… तरुणाईसमोरील नवे आणि गंभीर आव्हान!

पोलिसांचा धाडसी पाठलाग अन् आरोपी गजाआड; अकोला पोलिसांची वेगवान कारवाई

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!