Join WhatsApp group

Ads

नाशिकमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त ‘ऑलिम्पिक सप्ताह’चे आयोजन, 23 ते 30 जूनदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

By Sarkar Maza

June 20, 2026 8:20 pm

Ads

नाशिक, दि. 20 : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त नाशिकमध्ये यंदाही विविध क्रीडा उपक्रमांनी सजलेल्या ‘ऑलिम्पिक सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम यंदा 23 ते 30 जून या कालावधीत पार पडणार आहे.श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑलिम्पिक सप्ताहाची सुरुवात 23 जून रोजी सकाळी 8.30 वाजता ‘ऑलिम्पिक रन’ने होणार असून, काळाराम मंदिर ते कालिका मंदिर दरम्यान ही धाव आयोजित करण्यात आली आहे.

ऑलिम्पियन दत्तू भोकनळ आणि माजी क्रीडा मंत्र्यांचे ओएसडी रवींद्र नाईक यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात येणार आहे. कालिका मंदिर येथे श्री अण्णासाहेब पाटील आणि दीपक पाटील सहभागींचे स्वागत करणार आहेत.

यानंतर 24 जून रोजी सकाळी 10 वाजता कालिका मंदिर येथे जिल्हास्तरीय जंपरोप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

25 जून रोजी त्रिमूर्ती चौक येथील हेगडे वार मैदानावर जिल्हा सेपक टकरा स्पर्धा पार पडणार आहे.

26 जून रोजी चामार लेणी टेकडीवर सकाळी 9.30 वाजता सीड बॉल्स उधळण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

27 जून रोजी हिरावाडी येथे जिल्हा बास्केटबॉल स्पर्धा, तसेच मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे राष्ट्रीय फुटसाल व राज्यस्तरीय जंपरोप स्पर्धा होणार आहेत.

28 जून रोजी सकाळी 10 वाजता कालिका मंदिर येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, याच दिवशी राष्ट्रीय फुटसाल आणि राज्य जंपरोप स्पर्धेचा समारोप होणार आहे.

29 जून रोजी यशवंत व्यायाम शाळा येथे सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडणार आहे.

30 जून रोजी कालिका मंदिर सभागृहात सर्व जिल्हास्तरीय स्पर्धांचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार मनोज कोटक आणि सचिव संजय शेटे यांच्या हस्ते समारोप होणार आहे.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे आणि राजू शिंदे करीत आहेत.तसेच

तसेच अशोक कदम, दीपक निकम, अविनाश ढोली, उदय खरे, अविनाश वाघ, विक्रम दुधारे, तन्मय कर्णिक, भूषण सोडणीस, चिन्मय देशपांडे, मनीष बोरस्ते, रमेश क्षत्रिय, गणेश राऊत, भूषण भटाटे, शैलेश रकिबे, अंकुर सिंग, प्रवीण घोगरे, उमेश सेनभक्त आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!