Join WhatsApp group

Ads

--

शेतात बेवारस अवस्थेत आढळलेल्या वृद्धाची ओळख पटली

By Sarkar Maza

June 18, 2026 9:26 am

Ads

मुर्तिजापूर, दि. 18 जून: मुर्तिजापूर शहरातील राणा लेआऊट परिसरातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृताची ओळख रामेश्वर श्रावण नागोलकर (वय 72), रा. राणा लेआऊट, दत्त मंदिराजवळ, मुर्तिजापूर अशी पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर नागोलकर हे वयोमानामुळे मानसिक अस्वस्थतेप्रमाणे वागत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. ते दि. 14 जून 2026 रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ते सापडले नसल्याने दि. 15 जून रोजी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, दि. 17 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता नरेंद्र पुरी यांनी विशाल नागोलकर यांना माहिती दिली की, जुनी वस्ती येथील राजेश कनोजे यांच्या शेतात एक वृद्ध व्यक्ती मृतावस्थेत पडलेली आहे. त्यानंतर विशाल नागोलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्ती हे त्यांचे वडील रामेश्वर नागोलकर असल्याची ओळख पटली.

घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे फिर्यादी विशाल नागोलकर यांनी आपल्या जबानीत नमूद केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वृद्ध व्यक्ती शेत परिसरात पडून मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग क्र. 27/2026, कलम 194 बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शाम मडावी करीत आहेत. तसेच समाजसेवक सेनापती व अक्षय यांनी मूर्तदेह शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रामेश्वर नागोलकर यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा अशा दुर्दैवी परिस्थितीत अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!