Join WhatsApp group

Ads

आलेगावातील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी ३ आरोपी जेरबंद; अवघ्या ६ तासांत पोलिसांची मोठी कारवाई

By Sarkar Maza

June 14, 2026 7:28 pm

Ads

अकोला, दि. १४ जून – पातूर तालुक्यातील आलेगाव येथे अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे.

मृत –

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चान्नी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी कामगिरी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव येथील यश गजानन गिन्हे (वय १७) याच्यावर रविवारी वसंतराव नाईक शाळेसमोरील शेकापूर फाटा परिसरात गावातीलच काही तरुणांनी कौटुंबिक वादाच्या कारणावरून चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात यशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अचिंत चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एलसीबी, बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि चान्नी पोलीस स्टेशन अशी तीन स्वतंत्र पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने चैतन्य जगदीश काळपांडे (वय १९, रा. आलेगाव) व एका १६ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला अमरावती येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना दर्यापूर रोडवरील आपातापा परिसरातून ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यातील तिसरा आरोपी जतीन राजेश क्षीरसागर (वय १९, रा. विवरा) याला चान्नी पोलिसांनी अटक केली.

अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई व सखोल तपासासाठी पातूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ठाणेदार गंगाधर दराडे, सपोनि गोपाल जाधव, निलेश देशमुख, पोउपनि माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखा व चान्नी पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!